Delhi CJP Protest PM Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

CJP Protest : कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर सोमवारी कठोर कायदा करणार

Delhi CJP Protest Update News : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सोमवारी पेपरफुटी रोखण्यासाठी नवे विधेयक संसदेत मांडणार आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळालेल्या या विधेयकावर विरोधकांचा तीव्र विरोध कायम असून संसदेत मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • केंद्र सरकार सोमवारी पेपरफुटी रोखण्यासाठी नवे विधेयक संसदेत मांडणार

  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला

  • कॅबिनेटने विधेयकाला मंजुरी दिली

  • विरोधक संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे झालेली सरकारची कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नवी खेळी खेळलीय. येत्या सोमवारी पेपरफुटीसंदर्भात केंद्र सरकार महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे. मात्र विरोधकांनीही वेगळी रणनीती आखलीय. त्यामुळे ही कोंडी फुटणार का ? विधेयक संसदेत मंजूर होणार का?

जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तोडगा काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा डाव टाकलाय. गुरूवारी मध्यरात्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेपरफुटी रोखण्यासाठी सुधारित कायदा करण्याची घोषणा केलीय. विशेष म्हणजे या नव्या विधेयकाला तातडीनं कॅबिनेटची मंजुरीही घेण्यात आलीय.

सोमवारी हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार असून ते तातडीनं पारित करण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारनं नवं विधेयक आणलं असलं तरी विरोधक पाचव्या दिवशीही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत प्रधानांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नसल्याची भूमिका पुन्हा एकदा राहुल गांधींना मांडलीय.

केंद्र सरकार प्रधानांच्या राजीनाम्याचा मुद्दा सोडून सारं काही करायला तयार आहे. मात्र विरोधक राजीनाम्यावरच ठाम आहेत. त्यामुळे मोठी कोंडी निर्माण झालीय. अधिवेशनाचा हा संपूर्ण आठवडा पाण्यात गेलाय. त्यामुळे सोमवारी विधेयक मांडण्यापूर्वी पुढच्या दोन दिवसात सरकार विरोधकांशी चर्चा करून तोडग काढण्यात यशस्वी होणार का? विरोधक सोमवारी नव्या विधेयकावर चर्चा करण्यास तयार होणार का? या साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये गुढगाभर पाण्यात उभे राहून ध्वजारोहण

विद्यार्थी आंदोलनात देवेंद्र महतोंना मारहाण; सहकाऱ्यांनाही पोलिसांची धक्काबुक्की

Lord Krishna: महाभारतात श्रीकृष्णांनी शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा का केली होती?

Weight Loss: जिम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचंय? फिटनेस ट्रेनरने सांगितलेले 'हे' ७ रुल्स नक्की करा फॉलो

नागपूरच्या दोन नेत्यांमुळे मुंडेंनी भाजप सोडायचा निर्णय घेतला होता, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT