CJP founder Abhijeet Dipke was reportedly held inside Delhi Airport for nearly 90 minutes pti
देश विदेश

अभिजीत दिपकेला विमानतळावर का रोखलं? CJPच्या संस्थापकाभोवती अधिकाऱ्यांचा गराडा

CJP Founder Abhijeet Dipke : सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून आल्यानंतर दिल्ली विमानतळावर जवळपास ९० मिनिटे थांबवून ठेवण्यात आले होते. विमानतळाच्या आतील एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामुळे या विलंबावर आणि अधिकृत चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

  • अभिजीत दिपके अमेरिकेतून सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले.

  • सुरक्षा व सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला.

  • विमानतळाच्या आतला त्यांचा पहिला व्हिडिओ आला समोर

'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर तब्बल दीड तास दिल्ली विमानतळाच्या आत होते. त्यांना कशासाठी रोखण्यात आलं होतं. ते नेमके काय करत होते, अशी प्रश्न अनेकांना पडली होती, मात्र आता त्यावरून अखेर पडदा उठला आहे. विमानतळाच्या आत असलेला त्याचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. त्याला सामान्य प्रवाशांप्रमाणे थेट बाहेर येता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून सकाळी ७:४५ वाजता दिल्लीत उतरलेल्या अभिजित दिपके याला दिल्ली विमानतळावरील आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर थांबवून ठेवण्यात आले होते. दिल्ली विमानतळावरील सुरक्षा आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिपके यांना गराडा घातला होता. अधिकारी त्यांना गराडा घालून उभे असताना दीपके मात्र सातत्याने कोणाशीतरी फोनवर गंभीर चर्चा करत होते. सुमारे दीड तासांच्या विलंबानंतर त्यांना विमानतळाबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

चौकशी की सुरक्षा व्यवस्था? तर्क-वितर्कांना उधाण

दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, जंतर-मंतरकडे निघण्यापूर्वीच दिपके याला थेट आयकर विभागाच्या कक्षाबाहेर रोखल्यामुळे सामाजिक वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ही केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित कागदपत्रांची नियमित तपासणी होती की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेली रणनीती, हे स्पष्ट झालेले नाहीये . विमानतळाबाहेर त्यांचे शेकडो समर्थक त्यांच्या स्वागतासाठी आणि जंतर-मंतर आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाट पाहत उभे आहेत.

दरम्यान कॉकरोच जनता पक्षाने तरुणांना आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि संविधानाच्या चौकटीत राहून करावे असे आवाहन केले आहे. पक्षाने सांगितले आहे की, जर कोणी गोंधळ घालण्याचा किंवा अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर त्या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. सर्व आंदोलनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे किंवा पोलिसांना कळवावे. सीजेपीने सर्व समर्थकांना नेहमी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मुलींसाठी शॉर्ट कुर्तीच्या ट्रेंडी आणि युनिक 5 डिझाइन्स

सिया-चेतनच्या प्लॅनमध्ये आणखी एकाचा समावेश; वडिलांच्या संशयानंतर होणार सियाच्या भावाची चौकशी

Maharashtra News Live Update: तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी पुन्हा पावसाची हजेरी

Face Care: चेहऱ्यावर ओपन पोअर्स खूप झालेत? मग हा घरगुती सामग्रीने २ मिनिटांसाठी करा मसाज, लगेच दिसेल फरक

पावसाळ्यात केस गळती कमी करतील स्वयंपाकघरातील हे 2 पदार्थ, वापर करण्याची पद्धतही सोपी

SCROLL FOR NEXT