Cockroach Janta Party abhijeet deepke saam tv
देश विदेश

CJP Protest: मोठी बातमी! अभिजीत दीपकेची प्रकृती खालावली, टायफॉईड होऊनही आंदोलनावर ठाम; VIDEO समोर

Cockroach Janta Party abhijeet deepke heath update: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना टायफाईड झाला. प्रकृती बिघडली असतानाही ते आंदोलनावर ठाम आहेत.

Priya More
  • अभिजीत दीपके यांची प्रकृती बिघडली

  • टायफॉईड झाल्याचे ब्लड टेस्टमधून स्पष्ट झाले

  • त्यांनी व्हिडिओ शेअर करत प्रकृतीबाबतची माहिती दिली

  • आजारी असूनही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपकेची प्रकृती खालावली. अभिजीत दीपके यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्यांनी ब्लड टेस्ट केल्या असून त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यांना टायफॉईड झाल्याचे निदान झाले आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली. टायफॉईड झाला असताना देखील अभिजीत दीपके हे आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी सांगितले की, 'देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील.'

अभिजित दीपकेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की,, 'तुम्हा सर्वांना माहीत होते की गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती. ब्लड टेस्टेचे रिपोर्ट आले आहेत. मला टायफॉइड झाला आहे. माझ्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी उपचार सुरू आहेत. देशभरात शांततेने आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व समर्थकांचे मी आभार मानतो. तुम्ही या आंदोलनाला मोठे यश मिळवून दिले आहे. जर आपण असेच शांततेने आंदोलन करत राहिलो तर धर्मेंद्र प्रधान नक्कीच राजीनामा देतील.'

पंतप्रधान मोदींनी नीट पेपर फुटीविरोधात कठोर तरतुदी असलेले विधेयक संसदेत आणण्याची घोषणा केली. त्यावर अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, 'परीक्षेतील अनियमिततेविरोधात सरकार उचलू शकणारे सर्वात कठोर पाऊल म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवणे.' पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, 'मोदीजी उद्याच धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. तुम्ही उचलू शकणारी ही सर्वात कठोर कारवाई आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर प्रश्नपत्रिका फुटीविरोधात कठोर तरतुदी असलेले विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केले जाणार आहे. नीट पेपरफुटीचे आरोप समोर आल्यापासून सरकारने जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यासह अनेक पाऊलं उचलली आहेत. तसेच, जबाबदार असलेल्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विकेंडमुळे भंडारदरा परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन

Nag Panchami Horoscope : नागपंचमीपासून या 3 राशींचे नशीब अचानक चमकणार; पैशांचा पाऊस पडणार, तुमच्या भाग्यात काय?

Mehndi Designs 2026: रक्षाबंधनसाठी करा स्पेशल लूक, हातावर काढा या नव्या मेहेंदीच्या खास डिझाईन्स

विद्यार्थी आंदोलनात देवेंद्र महतोंना मारहाण; सहकाऱ्यांनाही पोलिसांची धक्काबुक्की

Lord Krishna: महाभारतात श्रीकृष्णांनी शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा का केली होती?

SCROLL FOR NEXT