Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले मराठी तरुण अभिजीत दीपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाई फेकली. शाई फेकत या महिलेने दीपके यांना जाहीरपणे अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आंदोलक सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने आणि त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यामुळे ही महिला प्रचंड संतापली होती. वांगचुक यांच्या प्रकृतीला आंदोलनकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप करत तिने हा राडा केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जंतर-मंतरवर काही काळ तीव्र तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळचा पोलीस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.