सिगारेटमुळे वाचला महिलेचा जीव; धक्कादायक घटना झालेय CCTV मध्ये कैद (पहा Video) @ConorGogarty/ SaamTV
देश विदेश

सिगारेटमुळे वाचला महिलेचा जीव; धक्कादायक घटना झालेय CCTV मध्ये कैद (पहा Video)

घटनेतील महिला आपल्या कामातून वेळ काढून सिगारेट ओढण्यासाठी पबच्या आतमध्ये गेल्या होत्या. तिकडे सिगारेट पेटवली आणि त्या सिगारेट ओढत असताना त्यांना अचानक एक मोठा आणि विचित्र आवाज आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण अनेकदा म्हणतो सिगारेट (Cigarettes) आयुष्यासाठी घाचक आहे. मात्र आता एका महिलेसाठी मात्र सिगारेटच जीवनदाता बनून अवतरलं आहे. कारण चक्क ती सिगारेट ओढत होती म्हणूनच ती वाचली आहे हो.. पटत नसलं तरी ही गोष्ट खरी आहे. कारण याबाबतचा एक व्हीडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे.

सदरची घटना वेल्समधील एका पबमध्ये काम करणाऱ्या 55 वर्षीय शेरेल पाउंड या महिलेसोबत घडली आहे. जी पाहून बघणारे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. शेरेल पाउंड या आपल्या कामातून वेळ काढून सिगारेट ओढण्यासाठी पबच्या आतमध्ये गेल्या होत्या. तिकडे सिगारेट पेटवली आणि त्या सिगारेट ओढत असताना त्यांना अचानक एक मोठा आणि विचित्र आवाज आला. आणि काय झालं बघतात तर ज्या ठिकाणी त्या काही वेळापूर्वी ती जिथे उभ्या होत्या त्याच ठिकाणी एक मोठं मोठं झाड पडलं होतं.

दरम्यान या घटनेबद्दल शेरेल यांनी सांगितले की, त्या दिवशी खूप जोरदार वादळ आले होते. त्यांच्याकडे बारमध्ये पेय पोहोचवण्याचे काम होते. दरम्यान कामाच्या मधल्या वेऴेत त्य़ा सवयीप्रमाणे सिगारेट ओढण्यासाठी ब्रेक घेतला. तितक्यात त्यांच्या सोबत सदरचा प्रसंग घडला आणि सुदैवाने सिगारेटमुळे त्यांचा जीव वाचला. शिवाय ते झाड पडल्याने बारचे 4 टेबल जाग्यावरच तुटले आहेत यावरुनच ते झाड त्यांच्या अंगावर पडले असते तर काय झाले असते याचा अंदाज लावू शकतो.

या संपुर्ण घटनेबाबत ट्विट करताना कोनोर गोगार्टी यांनी असं लिहलं आहे की"त्या सिगारेटने माझा जीव वाचवला." त्या साठी सिगारेटला धन्यवाद ! असं ती महिला म्हणाली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT