Telangana News Saam TV
देश विदेश

Telangana News:चॉकलेटने घेतला ८ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव; काळीज पिळवटून टाकणारी घटना

त्याने पटकन चॉकलेटचा तुकडा तोडला आणि तोंडात टाकला.

साम टिव्ही ब्युरो

Telangana News:चॉकलेट म्हणजे लहान मुलांसाठी जीव की प्राण. लहान मुलं कितीही रडत असली तरी एक चॉकलेट दिलं की, लगेचच शांत होतात. अनेक मोठ्या व्यक्ती देखील चॉकलेट खाण्याचे हौशी असतात. अशात तेलंगणा राज्यात याच चॉकलेटमुळे मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका ८ वर्षीय मुलाचा चॉकलेट खाल्याने मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा (Telangana) येथील वारंगळ शहरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. संदीप सिंह असे मृत मुलाचे नाव आहे. या चिमुकल्याच्या बाबांनी परदेशाहून काही चॉकलेट्स आणले होते. बाबांनी आपल्यासाठी एवढे चॉकलेट्स (chocolate) आणलेत हे पाहून तो खूप खुश झाला. त्याने पटकन चॉकलेटचा तुकडा तोडला आणि तोंडात टाकला.

हेच चॉकलेट थेट त्याच्या श्वासनलिकेत अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. कुटुंबीयांना हे समजाच त्यांनी त्याच्या तोंडातून चॉकलेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चॉकलेट मोठं असल्याने ते त्याच्या श्वासनलिकेतून पुढे ही जात नव्हते आणि बाहेरही येत नव्हते. यामुळे संदीपला गुदमरू लागले.

श्वास घेता येत नसल्याने तो जागेवरच तरफडू लागला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले. या घटनेने संदीपच्या आई बाबांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापूर पुन्हा हादरले! भररस्त्यात १० वर्षीय मुलीचा विनयभंग, रिक्षाचालकाच्या कृत्याने डोक्यात तिडीक

Tea Leaves : चहा पत्तीची जादू; काळवंडलेला चेहरा २ मिनिटांत हिऱ्यासारखा चमकणार, तुम्ही दिसाल फ्रेश

Mumbai Nagpur Corridor : समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडणार; मुंबई-नागपूर फक्त ८ तासात, वाचा सरकारचा नेमका प्लान काय?

Traditional ornaments on Paithani: पैठणीवर कोणते पारंपारिक दागिने उठून दिसतात?

Vande Mataram New Rules: 'वंदे मारतम्' कधी, कुठे अन् कसं गायचं? केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT