Surabhi Jayashree Jagdish
पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान मानली जाते. या साडीसोबत पारंपरिक दागिने परिधान केले जातात. त्यामुळे संपूर्ण लूक अधिक उठून दिसतो.
मुळात पैठणीची झळाळी, रंग आणि काठ यानुसार त्यावर घालणाऱ्या दागिन्यांची निवड केली तर ते अजून छान दिसतं. सोन्याचे, मोत्यांचे आणि मंदिर शैलीतील दागिने विशेष शोभून दिसतात.
ठुशी हा मराठमोळा गळ्यात बसणारा खास हार आहे. पैठणीवर ठुशी घातल्यास पारंपरिक लूक पूर्ण होतो. लग्न आणि सणासाठी हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.
कोल्हापुरी साज हा देवीच्या चिन्हांनी सजलेला हार असतो. तो पैठणीसह अतिशय शोभून दिसतो. धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमात तो परिधान केला जातो.
नथ
नथ हा मराठमोळ्या लूकचा एक मुख्य भाग मानला जातो. मोत्यांची किंवा ब्राह्मणी नथ पैठणीवर सुंदर दिसते.
सोन्याच्या पाटल्या आणि हिरव्या काचेच्या बांगड्या सामान्यपणे घातल्या जातात. हे कॉम्बिनेशन पैठणीसोबत खूप छान दिसतं.
या साडीवर मोठे झुमके किंवा बुगडी घातली जाते. हे दागिने चेहऱ्याचा लूक अजून स्पेशल करतात. केसांच्या अंबाड्यासोबत हे विशेष सुंदर दिसतं.
सोन्याचा कमरपट्टा साडीला नीट बसवतो. ब्रायडल किंवा फेस्टिव्ह पैठणीवर खास शोभतो.
पूर्ण मराठमोळा दागिन्यांचा साज यामुळे पूर्ण होतो.