Chocolate Health Benefits: चॉकलेट हा पदार्थ लहांनापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडतो. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटच्या चव चाखायला मिळतात.
हे देखील पहा -
राष्ट्रीय चॉकलेट चिप कुकी दिवस दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) पासून झाली. क्वचितच अशा काही व्यक्ती असतील त्यांना चॉकलेट खायला आवडत नसेल. मूड खराब असल्यावर, मन अस्वस्थ असल्यावर किंवा आपण गोंधळलेले असू त्यावेळी चॉकलेट खाणे आपल्याला फायदेशीर ठरते. परंतु, कधीकधी चॉकलेट न खाण्यासही सांगितले जाते. जर तुम्हीही चॉकलेटचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे चॉकलेट केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही परिपूर्ण आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) मानले जाते (Chocolate Health Benefits).
राष्ट्रीय चॉकलेट चिप कुकी डेचा इतिहास
राष्ट्रीय चॉकलेट (Chocolate) चिप कुकी डे दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम, याची सुरुवात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) पासून झाली. शेफ रुथ ग्रेव्हज वेकफिल्ड यांनी प्रथमच हा दिवस साजरा केला. तो व्हिटमन, मॅसॅच्युसेट्स जवळील टोल हाऊस इनचा मालक होता. १९३८ मध्ये बेकर्स चॉकलेट्सचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यांनी सेमी स्वीट चॉकलेट बनवण्याचे काम सुरू केले. ते बेकरच्या चॉकलेटप्रमाणे कुकीच्या पीठात विरघळत नाही. ही कुकी बाजारात आल्यावर खूप आवडली होती. त्याच्या लोकप्रियतेनंतर, वेकफिल्डने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सुरुवातीला तो चॉकलेट क्रंच कुकीज म्हणून ओळखला जात असे. काही दिवसांनी, वेकफिल्डच्या संमतीनंतर हा दिवस साजरा करण्यात आला.
चॉकलेटचे खाण्याचे फायदे
१. चॉकलेट हे अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना मानले जाते. हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे.
२. अँटी-ऑक्सिडंट्स तणाव कमी करतात आणि स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रणात ठेवतात. अशा स्थितीत चॉकलेट खाल्ल्याने मूड चांगला राहतो आणि तणाव दूर होतो.
३. चॉकलेटमुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्हनॉल रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो.
४. चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते. आपले वजन वाढत असेल तर चॉकलेट खा. संशोधनानुसार, चॉकलेट खाणाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स हा चॉकलेट न खाणाऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी असतो.
५. चॉकलेट हृदयासाठी देखील चांगले मानले जाते. हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.