उत्तर प्रदेशमध्ये १३ वर्षांच्या मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या
मृतदेह बॉक्समध्ये लपवून ठेवला
मुख्य आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
घटनेनंतर चित्रकूटमध्ये तणावपूर्ण वातावरण
उत्तर प्रदेशच्या १३ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. चित्रकूटमध्ये ही घटना घडली असून व्यापाऱ्याच्या मुलाचे आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तर आणखी एक आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी झाला असून त्याला उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या हत्याकांड प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूट येथे राहणारे व्यापारी अशोक केसरवानी यांच्या १३ वर्षांच्या मुलाचे भाडेकरूने आपरहण केले होते. गुरूवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. ओळखीचा फायदा घेत आरोपीने व्यापाऱ्याच्या मुलाला तुला बाईक शिकवतो असे बोलून सोबत घेऊन गेला होता. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस मुलाचा शोध घेत असताना त्यांना एका बंद बॉक्समध्ये मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सूरू केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी कुल्लूचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तर त्याच्या साथीदाराला एन्काऊंटरमध्ये गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपी इरफान हा १० डिसेंबरपर्यंत व्यापाऱ्याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. व्यापाऱ्यासोबत वाद झाला त्यामुळे त्याला खोली रिकामी करावी लागली होती. याचाच बदला घेण्यासाठी त्याने सहकाऱ्याच्या मदतीने व्यापाऱ्याच्या मुलाचे अपरहण करत त्याची हत्या केली. आरोपीला मुलगा ओळखत होता. त्यामुळे बाईक शिकण्यासाठी तो त्याच्यासोबत गेला. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी त्याची हत्या केली आणि मृतदेह एका बॉक्समध्ये लपवून ठेवला.
मुलाच्या हत्येचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बारगड शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतर पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. आरोपीचा एन्काऊंटर केल्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केला. या घटनेमुळे सध्या उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.