Plastic Surgery News SaamTv
देश विदेश

Cosmetic Surgeries : सुंदर दिसण्याचा अट्टहास नडला, 24 तासात 6 कॉस्मेटिक सर्जरी केल्याने चिनी महिलेचा मृत्यू 

Chinese Woman Dies After Cosmetic Surgeries : सुंदर दिसण्याचा अट्टहास एका चिनी महिलेच्या जीवावर बेतला आहे. एका चिनी महिलेने आपल्या शरीराशी धोकादायक कृत्य केल्याने तीला थेट मृत्यूने गाठले.

Saam Tv

प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसण्याची इच्छा असते आणि यासाठी प्रयत्न करणे सामान्य आहे, पण सुंदर दिसण्याचा अट्टहास एका चिनी महिलेच्या जीवावर बेतला आहे. सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी एका चिनी महिलेने आपल्या शरीराशी असे धोकादायक कृत्य केले की त्यामुळे तीला थेट मृत्यूने गाठले. 2 मुलांच्या या आईने एका दिवसात 6 थोड्याथोडक्या नाही तर, तब्बल 6 कॉस्मेटिक सर्जरी केल्या. जे तीच्या मृत्यूचे कारण ठरले.

सुंदर दिसण्याच्या अट्टहासपोटी केले असे कृत्य

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, दक्षिण चीनच्या गुआंक्सी प्रांतातील एक महिला दोन मुलांची आई झाली होती. तिला खूप सुंदर आणि तरुण दिसायचे होते. यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरी करायचं ठरवलं. तिने एका ब्युटी क्लिनिकमध्ये जाऊन एकाच दिवसात 6 कॉस्मेटिक प्रक्रिया केल्या. त्यासाठी तीने पापण्यांची दुहेरी शस्त्रक्रिया करून नंतर नाक दुरुस्त करून घेतले.

यानंतर, ती इथेच थांबली नाही, तर तिने सडपातळ दिसण्यासाठी लायपोसेक्शन प्रक्रिया करून तिच्या मांड्यांवरची चरबी काढून टाकली. त्यानंतर, काही काळानंतर, महिलेने तिच्या चेहऱ्यावर आणि स्तनांवर चरबी वाढवण्याची प्रक्रिया केली. याचा अर्थ ती अनेक तास एकामागून एक कॉस्मेटिक प्रक्रिया करत राहिली.

प्रथम बेशुद्ध झाली आणि नंतर मृत्यू झाला

या सर्व शस्त्रक्रियेनंतर या महिलेला 2 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येणार होता पण त्यापूर्वीच ती अचानक बेशुद्ध झाली. त्यानंतर तीला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तीला मृत घोषित करण्यात आले. महिलेच्या शवविच्छेदन अहवालात अवयव निकामी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असून यामागील कारण लिपोसक्शन शस्त्रक्रिया होते. याशिवाय एकामागून एक केलेल्या शस्त्रक्रियांमुळे तीच्या शरीरावर खूप ताण आला होता.

कुटुंबाने मागितली भरपाई 

दोन मुलांच्या आईच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी क्लिनिकवर दावा ठोकला आणि भरपाईची मागणी केली. बेकायदेशीरपणे ही प्रक्रिया पार पाडल्याबद्दल न्यायालयाने ब्युटी क्लिनिकला 10 लाख युआन म्हणजेच सुमारे 1.25 कोटी रुपये मृताच्या कुटुंबाला भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र या प्रकरणावर दवाखान्यात दाद मागितल्याने काहीसा दिलासा मिळाला. आता ते कुटुंबाला सुमारे 5 लाख 90 हजार युआन म्हणजेच 70 लाख रुपयांची भरपाई देणार आहे. हे प्रकरण 9 डिसेंबर 2020 चे आहे, त्यावर नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT