अंजीर आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. अंजीरला एक सिक्रेट 'सुपर फूड' मानलं जात. गुणकारी अंजीर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आयुर्वेदमध्ये अंजीरचे अनेक फायदे सांगितले आहेत. सुके अंजीर खाण्याचे लाभदायी फायदे आहेत. तसेच अंजीर खाण्याची योग्य वेळ असते. जाणून घेऊयात अंजीर कधी आणि कसे खावेत.
तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ अंजीर भिजत घालावे आणि सकाळी अंजीर खावे. अंजीर भिजवलेले पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अंजीर किंवा भिजवलेल्या अंजीरचं पाणी पोटासाठी खूप फायदेशीर आहे. भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबर जास्त प्रमाणत असतं. त्यामुळे बद्धकोष्ठताची समस्या दूर होते आणि पोट साफ राहतं.
ज्या लोकांचे हृदयाचे ठोके वाढतात आणि जास्त थकल्या सारखे किंवा घाबरल्या सारखे वाटते. त्या लोकांना अंजीरचं पाणी आणि अंजीर गुणकारी आहे. ॲनिमियाच्या रुग्णासाठी अंजीर आणि भिजवलेल्या अंजीरचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. सुके अंजीर रोज खल्याने शरीरात रक्ताची कमतरता जाणवत नाही आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी होत नाही.
ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित आहे. त्यासाठी अंजीर आणि अंजीरचं पाणी खूप फायदेशीर आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्वे अंजीरमध्ये असतात.
Edited by - Archana Chavan