चिनी सैन्याकडून १७ वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण; सुटकेकरिता खासदाराने केंद्राकडे केली विनंती
चिनी सैन्याकडून १७ वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण; सुटकेकरिता खासदाराने केंद्राकडे केली विनंती Saam Tv
देश विदेश

चिनी सैन्याकडून १७ वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण; सुटकेकरिता खासदाराने केंद्राकडे केली विनंती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: चिनी सैन्याने (Chinese Army) भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून अरुणाचल प्रदेश येथून (Arunachal Pradesh) १७ वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याच्या सुटकेकरिता भाजप खासदाराने केंद्राकडे ट्विट करत विनंती केली आहे. अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ (Tapir Gao) यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) राज्यामधील भारतीय हद्दीत अपर सियांग (Siang) जिल्ह्यात (district) एका १७ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मिराम तारोन असे आहे. अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) शियांग नदी भारतात (India) प्रवेश करते. तेथील ठिकाणाजवळच ही धक्कादायक घटना घडल्याचे खासदार (MP) गाओ यांनी यावेळी सांगितले आहे. याअगोदर गाओ यांनी ट्विट (Tweet) करत किशोरच्या अपहरणाची माहिती देण्यात आली होती. '१८ जानेवारी दिवशी चिनी सैन्याने अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्यात आली होती होती.

सीमेवरील (border) अप्पर सियांग जिल्ह्यात लुंगता जोर येथे त्यांनी मीरम तरोन आणि त्याचा मित्र जॉनी यायिंग यांचे अपहरण केले होते. हे दोघेही झिडो गावामधील राहणारे आहेत. मीरमचा दोस्त चिनी सैन्याच्या तावडीतून निसटला आहे. मात्र, मीरमचा कोणताच पत्ता लागला नाही. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच, मीरमच्या मित्राने संपूर्ण घटनाक्रम भारतीय लष्कराला सांगितले आहे.

मीरमच्या सुटकेकरिता केंद्र सरकारच्या सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावी, अशी विनंती गाओ यांनी यावेळी केली आहे. गाओ यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले आहे. याबरोबरच त्यांनी दोघांचा फोटो देखील शेअर केला आहे. याअगोदर चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

SCROLL FOR NEXT