China Video Saam Tv
देश विदेश

China Video: चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवलं| VIDEO

China Viral Video of a Man Rescue a Child from Window: चीनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक लहान बाळ चौथ्या मजल्याच्या खिडकीत अडकले होते. त्याला वाचवण्यासाठी ३ तरुणांनी आपला जीव धोक्यात घातला आहे.

Siddhi Hande

चीनमध्ये माणुसकीचे दर्शन

चौथ्या मजल्याच्या खिडकीत अडकले होते लहान बाळ

तरुणाने जीवाची पर्वा न करता वाचवले बाळाचे प्राण

सध्याच्या जगात माणूसकीचे दर्शन फार कमी पाहायला मिळते. प्रत्येकजण फक्त आपल्यापुरतं बघत असतात. याच स्वार्थी जगात कुठेतरी माणुसकीचे दर्शन होते. चीनच्या गुआंगझौ शहरात अशीच एक घटना घडली आहे. एका लहान बाळाला वाचवण्यासाठी एक व्यक्ती चक्क खिडकीवरुन चौथ्या मजल्यापर्यंत चढला आणि त्याने बाळाचा जीव सुखरुप वाचवला.

चीनमधील घटना

२४ डिसेंबरला संध्याकाळी तियान्हे येथील एका रहिवासी सोसायटीत एक लहान मूल चौथ्या मजल्याच्या खिडकीत अडकले होते. हे मूळ खेळता खेळता खिडकीच्या सेफ्टी ग्रिलमध्ये अडकले. मुलाचे डोके ग्रिलच्या लहानशा फटीत अडकले होते आणि पाय बाहेर लटकलेले होते. हे बाळ जोरजोरात रडत होते. त्यामुळे आजूबाजूला गर्दी झाली.

खिडकीच्या ग्रिलमध्ये डोके अडकल्याने त्या बाळाला काही करताही येत नव्हते. त्याला काही करताही येत नव्हते. त्यात घरातदेखील कोणीही नव्हते. घराचे दिवे बंद होते. यामुळे कोणालाच काय करावे हे समजत नव्हते. जेव्हा या मुलाचा रडण्याचा आवाजा आला तेव्हा आजूबाजूला खूप गर्दी झाली.

तीन तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून बाळाला वाचवलं

जमलेल्या लोकांपैकी कोणालाच काय करावे हे कळत नव्हते. तेवढच्या तीन तरुण पुढे सरसावले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या मुलाला वाचवले. एका तरुणाने बाहेरुन खिडकीवर चढण्यास सुरुवात केली. तिथे असलेले पाईप आणि इतरांच्या खिडकीच्या आधारे तो हळूहळू वर चढू लागला.

एक तरुण वर चौथ्या मजल्यापर्यंत चढला तर दोन तरुण खाली चादर घेऊन उभे होते. जेणेकरुन जर मुलं पडले तर त्याला झेलता येईल. वर चौथ्या मजल्यावरच्या खिडकीजवळ हा तरुण पोहचला आणि त्याने त्या मुलाला वाचवले. हळूच त्याचे डोके ग्रिलमधून आतमध्ये ढकलले. त्यानंतर तो मुलगा पूर्णपणे खिडकीतून आतमध्ये घरात गेला.

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहचले. परंतु त्याआधीच या मुलांनी बाळाला सुखरुप बाहेर काढले होते. हे बचाव कार्य अवघ्या १० मिनिटात पूर्ण झाले. या मुलाची नंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बाळ सुखरुप असल्याचे समजले.

चीनमधील हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या तरुणांचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. माणुसकीचे दर्शन आणि लहान मुलाचा जीव वाचवल्याबद्दल या तरुणांचे खूप कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : एका महिन्यात किती वेळा फेशियल आणि क्लिनअप केले पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

Navi Mumbai: ऐन निवडणुकीत आमदार मंदा म्हात्रे आणि नाईकांमधील वाद पुन्हा उफाळला, नवी मुंबईचं राजकारण तापलं

झटपट पटापट! फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

Silk Saree Designs: सिल्क साडीवर मॅचिंग नाही, हे 6 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिसतील परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

SCROLL FOR NEXT