xi jinping
xi jinping  saam tv
देश विदेश

China News: चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत? राजधानी बीजिंगमध्ये आर्मी तैनात

Vishal Gangurde

China News : चीनमधून (China) त्यांच्या राष्ट्राचे राष्ट्ररपती शी जिनपिंग यांच्याबाबत मोठं वृत्त समोर येत आहे. चीनच्या सैन्याने शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. शी जिनपिंगने यांना नजरकैदेत ठेवून देशाच्या राजधानीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला जात आहे. मात्र, चीनच्या अधिकृत माध्यमांमध्ये सत्तापालट झाल्याचे कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही. (xi jinping News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, चीनची राजधानी बीजिंगवर सैन्याने नियंत्रण मिळवलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी बीजिंगमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य पोहोचलं आहे. बीजिंगचा संपर्क जगाशी तुटला आहे. चीनी सैन्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शी जिनपिंग यांना चीनी सैन्याच्या प्रमुखाने लष्कराच्या पदावर हटवून घरात नजरकैदेत ठेवले आहे. मात्र, या वृत्ताला चीनमधून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

दरम्यान, भाजपचे (Bjp) सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर चीनमधील अस्थिरतेवर भाष्य केलं आहे. स्वामी यांनी ट्विट करत म्हणाले की, 'चीनमधील अफवांची चौकशी केली पाहिजे. शी जिनपिंग खरच बीजिंगमध्ये नजरकैदेत बंद आहेत? शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये होते असं सांगितलं जातं. तेव्हा चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी त्यांना लष्कराच्या अध्यक्षपदावरून हटवलं. त्यानंतर त्यांना हाऊस अरेस्ट केल्याची जोरदार अफवा आहे, असं स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ली कियोओमिंग हे चीनचे नवे राष्ट्रपती बनले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, वृत्ताला कोणीही अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. आंतररष्ट्रीय पत्रकारांनी मात्र ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. तसेच चीनच्या बातम्या देणाऱ्या ग्लोबल टाईम्स, सीएएन आणि बीबीसी सारख्या वृत्तवाहिन्यांनीही याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde News | मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी! मोठी बातमी...

Today's Marathi News Live : Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द, भीषण दुष्काळामुळे निर्णय

Eknath Shinde : मोठी बातमी! नाशिकमध्ये हेलिपॅडवर CM शिंदेंच्या बॅगांची तपासणी

Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

Milk Price : दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; अंगावर दूध ओतून केला सरकारचा निषेध

SCROLL FOR NEXT