मुंबई : PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. असा खळबळजनक दावा केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. जुलै 2022 मध्ये पीएफआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उत्तरप्रदेशातील इतर संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याच्या कट रचला होता, असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे. (PM Narendra Modi News Today)
देशभरात दोन दिवसांपूर्वी तपास यंत्रणांकडून पीएफआयच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आलं. केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर केलेली कारवाई ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी पीएफआयने पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा डाव रचला होता, असा धक्कादायक दावा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमधून पीएफआय संघटनेचा सदस्य शफीक पायेथला अटक केली होती. त्याच्या रिमांड नोटमध्ये तपास यंत्रणांनी हा दावा केला आहे. (PFI Planned To PM Narendra Modi Attack)
अंबलबजावणी संचालय म्हणजेच ED कडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ईडीच्या माहितीनुसार, जुलै 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी पीएफआयकडून प्रशिक्षण शिबिराची स्थापना करण्यात आली होती. 2013 साली इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोटही घडवला होता. असंही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यात पाटणा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तएवजांमध्ये 'इंडिया 2047' नावाने पीएफआयचे बुकलेटही होते. यात 2047 पर्यंत भारताला मुस्लिम देश बनविण्याचे 'दहशतवादी ब्ल्यूप्रिंट' होते. याच वेळी, पीएफआय आपल्या नापाक मनसुब्यांसाठी जागो-जागी ट्रेनिंग कॅम्प लावत आहे, असेही समोर आले होते.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.