Chinese tanker sails through the Strait of Hormuz despite heavy US naval presence, signaling rising global tensions. saam tv
देश विदेश

चीननं अमेरिकेची नाकेबंदी झुगारली, चीननं हाणून पाडले ट्रम्पचे मनसुबे

China defies US naval blockade in Hormuz Strait: इराण-अमेरिका यांच्यातील बोलणी फिस्कटली आणि ट्रम्प यांनी थेट सागरी नाकेबंदीचे आदेश दिले. मात्र दुसरीकडे चीननं अमेरिकेची नाकेबंदी झुगारून लावलीये. चीननं ट्रम्प यांचे मनसुबे कसे हाणून पाडलेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

अमेरिका- इराण बोलणी फिस्कटली आणि होर्मुझ पुन्हा कळीचा मुद्दा बनलं. इराणची पूर्णत: नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकनं मोठा फौजफाटा तैनात केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ऑपरेशन स्ट्रेट शील्ड लाँच केलं. युएसएस अब्राहमसह अमेरिकेने 15 युद्धनौका होर्मुझमध्ये तैनात केल्या आहेत. तसंच, त्रिपोली अॅम्फिबियस रेडी ग्रुपमधील तीन जहाज, अण्वस्त्रवाहू पाणबुड्यांसह 150 लढाऊ विमानही इथे तैनात करण्यात आलीयेत.

मात्र या नाकेबंदीने चीन चांगलचं चवताळला.चीननं होर्मुझ आमच्यासाठी खुली असल्याचं सांगत अमेरिकेच्या इशाऱ्याला धुडकावून लावल आणि आपली सागरी वाहतूक सुरूच ठेवली.होर्मुझमध्ये अमेरिकेनं इतका मोठा फौजफाटा तैनात करूनही चीननं आपलं तेलवाहू जहाज सुरक्षितरित्या बाहेर काढलंय.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर आणि नौदलाची नाकेबंदी असूनही एका चीनी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढल्याने जागतिक स्तरावर नव्या चिंतेला तोंड फुटलंय. शिपिंग डेटानुसार, ‘रिच स्टारी’ नावाचा टँकर होर्मुझमधून यशस्वीरित्या बाहेर पडला. शांघाय झुआनरुन शिपिंग कंपनीचा टँकर अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून सुरक्षित बाहेर पडला युएईच्या हमरिया बंदरातून सुमारे 2.5 लाख बॅरल मेथनॉल घेऊन हे जहाज चीनच्या दिशेनं रवाना झालंय.

आपली जहाजे सुरक्षित बाहेर काढून बलाढ्य अमेरिकेच्या वर्चस्वालाच एकप्रकारे चीननं थेट आव्हान दिलंय. इतकंच नाही तर इराणच्या प्रतिकाराला चीनचं पाठबळ असेल तर आगामी काळात अमेरिका-चीन यांच्यात संघर्ष उफाळून येऊ शकतो. तसंच, चीन उघडपणे भूमिका घेत नसलं तरी अमेरिका आता याला कसं प्रत्युत्तर देत याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinchu Home Remedies : घरात विंचू येण्याने त्रस्त आहात? हे ४ उपाय करतील कायमचा बंदोबस्त

मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?

Saree Storage Tips: पैठणी ते साधी साडी; पाहा साडीची घडी नक्की कशी घालायची, साड्या घडीवर कधीच नाही फाटणार

जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी

SCROLL FOR NEXT