BJP internal conflict latest political news  saam tv
देश विदेश

Politics: भाजपमध्ये भलं मोठं खिंडार, धडाधड 100 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे; राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Internal Crisis Resignations: छत्तीसगडमधील डोंगरगड येथे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गटबाजी, मनमानी कारभार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना दुजाभाव केल्याचा आरोप करत 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत

Bharat Jadhav

  • छत्तीसगडच्या डोंगरगडमध्ये भाजपच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे.

  • जिल्हा नेतृत्वावर गटबाजी, मनमानी आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप.

  • घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला अशून त्याच वादाच्या कारणामुळे १०० भाजप कार्यकर्त्यांचे धडाधड राजीनामे दिलेत. छत्तीसगडमधील भाजपमधील अंतर्गत असंतोषामुळे येथील डोंगरगड भागातील १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

राजीनामा देणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वावर मनमानी कारभार, गटबाजी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. दरम्यान स्थानिक पातळवरील पक्षातील परिस्थितीबाबत राज्य नेतृत्वाला माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आणि पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचा आदर राखून व त्यांच्या सहभागाची खात्री करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला.

पक्षातील संघटना होणार कमजोर

१०० हून अधिक राजीनाम्यांमुळे संघटनेसमोर चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. डोंगरगड भागातील १०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा एकत्रितपणे राजीनामा दिलाय. या घडामोडीमुळे जिल्हा संघटनेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. पक्षांतर्गत याकडे केवळ स्थानिक वाद म्हणून न पाहता, संघटनात्मक समन्वयापुढील एक आव्हान म्हणून पाहिले जात आहे. आता हे प्रकरण राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचले असून, परिस्थिती लवकर पूर्ववत करण्याच्या उद्देशाने असंतोषाच्या कारणांची माहिती गोळा केली जात आहे.

कार्यकर्त्यांनी का दिला राजीनामा?

इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी राजीनामा का दिला असा प्रश्न उपस्थित होतोय. राजीनामा देणाऱ्यापैकी काही जिल्हा पातळीवरील नेत्यांचा होत असलेल्या दुजाभाव. पक्षातील कार्यकर्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष आणि पक्षात निर्माण होत असलेली गटबाजीला कंटाळून अनेकांनी राजीनामा दिलाय. जर पक्षात स्थानिक पातळीवरील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांची मते, विचार ऐकून घेतली जात नसेल त्याला महत्त्व दिलं जात नसेल तर पक्षात असंतोष निर्माण होत असतो.

पक्ष नेतृत्वाचा थेट कारवाईचा इशारा?

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य भाजप नेतृत्वाने जिल्हा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला की, पक्षात कार्यकर्त्यांना दिला जाणारा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व महत्त्वाचे निर्णय हे कार्यकर्त्यांच्या सूचना आणि स्थानिक परिस्थिती यांचा विचार करूनच घेतले जावेत.जर पक्षातील एखाद्या नेत्याविरोधात मनमानी करत असेल किंवा इतर कार्यकर्त्यांचे ऐकत नसेल तर त्याच्याविरोधात पक्षश्रेष्ठी कारण्यास मागेपुढे पाहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या तारखांचा पुनर्विचार करावा- केसरकर

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT