15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी अखेर 'चलो मुंबई'चा नारा दिलाय... त्यामुळे मराठा समाज आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी सज्ज झालाय...मात्र मराठा आंदोलनासाठी जरांगे अतंरवालीतून कधी निघणार? मुंबईतील आंदोलनासाठी जरांगेंनी मराठा समाजाला काय आवाहन केलयं ?.पाहूयात या रिपोर्टमधून...
Manoj Jarange To March Towards Mumbai
Manoj Jarange To March Towards Mumbaisaam tv
Published On

ऐकलत.... जरांगे पाटलांनी मुंबईला आंदोलनासाठी जायचा का? असा सवाल मराठा आंदोलकांना विचारला आणि आंदोलकांनी एकच जल्लोष करत... मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा दिला...त्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाची स्थापना झाल्यावर 15 सप्टेंबरला जरांगे मराठा आंदोलकांसाठी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत...

दरम्यान मुंबईत पोहोचण्यासाठी जरांगे पाटलांनी ठिकठिकाणी मुक्कामाचं नियोजन केलयं... दररोज 100 किलोमीटरचा प्रवास करून मराठा आंदोलक मुंबईत कसे पोहचणार...पाहूयात...

चलो मुंबई

15 सप्टेंबर

पहिला मुक्काम - पाटोदा, बीड

16 सप्टेंबर

दुसरा मुक्काम - श्रीगोंदा, अहिल्यानगर

17 सप्टेंबर

तिसरा मुक्काम - हडपसर, पुणे

18 सप्टेंबर

चौथा मुक्काम - खोपोली

19 सप्टेंबर

अखेरचा मुक्काम - आझाद मैदानावर उपोषण सुरु

दुसरीकडे जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंच्या अटकेची मागणी केलीय.. तर दुसरीकडे सरसकट प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध असल्याची भूमिका बबनराव तायवाडेंनी घेतलीय. ज्यामुळे मुंबईतील आंदोलनानंतर मराठा- ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत...

एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरु झालेली असताना दुसरीकडे जरांगेंनी मुंबईकेड कूच करण्याची घोषणा केल्यानं आता सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी गणेशोत्सवातच जरांगेंनी हजारो आंदोलकांसह मुंबईत धडक दिली होती. मराठा आंदोलकांनी सरकारला नाकीनऊ आणलं होतं. गेल्यावेळी विजयाचा गुलाल लावून परतलेले मराठे यावेळी संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईत परत येमार नसल्याचं जरांगेंनी सांगितलंय. त्यामुळे गेल्यावेळपेक्षा यावेळी सरकारसमोर मोठं आव्हान तर आहेच मात्र यावेळी संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com