Indian Army
Indian Army Saam TV
देश विदेश

Chhattisgarh Naxalite Attack: सुकमा जिल्ह्यात मोठा नक्षली हल्ला; ३ जवान शहीद तर २ गंभीर जखमी

Ruchika Jadhav

Chhattisgarh Naxalite Attack: छत्तीसगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील सुकमा जिल्ह्यात मोठा नक्षली हल्ला झााला आहे. या हल्ल्यात डीजीआरचे ३ जवान शहीद झाले आहेत. तसेच २ जवानांना गोळी लागल्याने ते जखमी आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास हल्ला करण्यात आला.

सुकमा येथे झालेल्या या हल्ल्यात नक्षलवाद्यांचे देखील अनेक व्यक्ती मारले गेले आहेत. मात्र यापैकी कोणीही हाती लागले नाही, असे सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी सांगितले आहे. यासह जवानांची शोधमोहीम सुरूच आहे. आणखीन एक टीम देखील बॅकअपसाठी तयार करण्यात आली आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांसाठी देखील एक टीम घटळास्थळी दाखल झाली आहे. नक्षलवादी समोर आल्यानंतर बराचवेळ चकमक सुरू होती. त्यामुळे जागरगुंडा कॅम्पमधून एक टीम गस्त घालण्यासाठी पाठवण्यात आली आहे.

८ ते १० नक्षलवादी ठार

जवान नक्षलवाद्यांवर हल्ला करत असताना दोन्ही बाजूंनी फायरींग झाली. यावेळी त्यांच्याकडील ८ ते १० नक्षलवादी मारले गेलेत असं, एसपी सुनील शर्मा म्हणाले. एवढे जण मारले गेले असूही त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे जवानांकडून याचे शोधकार्य सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: त्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT