Naxal : नक्षलवादी संघटनांना गडचिराेली पाेलिसांचा धक्का; दाेघांचे समर्पण

गेल्या दोन वर्षात एकूण 51 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
naxalites , gadchiroli police
naxalites , gadchiroli policesaam tv

- मंगेश भांडेकर

Gadchiroli : गडचिरोली पोलीस दलापुढे दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केले आहे. नक्षलवादी संघटनांच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना (police) मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. अनिल कुजूर आणि रोशनी पल्लो असं आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची (naxal) नावे आहेत. (Gadchiroli Latest Marathi News)

अनिल कुजूर (वय 26) तसेच रोशनी पल्लो (वय 30) या दाेन्ही नक्षलवाद्यांवर एकत्रितरित्या सहा लाखांचे बक्षीस पाेलिसांनी जाहीर केले होते. हे दोघेही सध्या स्वतःच्या राहत्या घरातून नक्षल चळवळीला वेळोवेळी मदत करत होते. या दोघांचा वेगवेगळ्या हिंसक नक्षली कारवायांत सहभाग असायचा.

naxalites , gadchiroli police
School Bus : बसनं घेतला पेट, युवकांच्या धाडसानं टळली माेठी दुर्घटना

अनिल हा एटापल्ली तालुक्यातील रहिवासी आहे. तर रोशनी या छत्तीसगडच्या नारायणपूरच्या रहिवासी आहेत. या दोघांना प्रत्येकी पाच लाख आत्मसमर्पण रक्कम घोषित करण्यात आली आहे असे पाेलिस दलानं नमूद केले. दरम्यान गेल्या दोन वर्षात एकूण 51 नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली टाकत गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे अशी माहिती अंकित गोयल (पोलिस अधीक्षक, गडचिरोली) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

naxalites , gadchiroli police
Aandolan : सरकारचा निषेध; शेतक-यांनी महामार्गावर पेटवला टायर, फेकलं दूध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com