Dantewada Naxalites Encounter Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, १६ नक्षलवाद्यांचा खात्मा; २ जवान जखमी

Dantewada Naxalites Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. अजूनही चकमक सुरूच आहे.

Priya More

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश आले आहे. दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीमध्ये २ जवान जखमी झाले आहेत. सध्या दंतेवाडामध्ये चकमक सुरूच आहे. त्याचसोबत जवानांकडून शोध मोहीम देखील सुरू आहे. घटनास्थळावरून जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या सुकमा आणि दंतेवाडा सीमावर्ती भागातील उपमपल्ली केरलापाल क्षेत्रातील जंगलात नक्षलवादी आणि जवानांमध्ये मोठी चकमक झाली. नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. या चकमकीत १६ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरूच आहे. शनिवारी सकाळी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन जवानांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळपाल पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात ही चकमक झाली. जिथे सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईकरत होते. त्यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर ही चकमक झाली. शुक्रवार रात्रीपासन सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. सुरक्षा दलाला नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी ही मोठी कारवाई केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) कर्मचारी या कारवाईत सहभागी आहेत. या भागात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. या चकमकीत माओवादी सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली याचा देखील खात्मा करण्यात आला. ज्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. यासोबतच घटनास्थळावरून इन्सास रायफल, ३०३ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut on Bihar election: बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊतांना वेगळाच संशय, पोस्ट व्हायरल

Gold Rate Today: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Bihar Election Result Live Updates : बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक, विरोधक ४० आताच

Chapati Vs Bhakri: भाकरी की चपाती, पचनासाठी काय योग्य? वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT