Security forces eliminate 10 Maoists in Chhattisgarh; ₹1 crore bounty commander among the dead saam tv
देश विदेश

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

Chhattisgarh Operation: गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी सुरू आहेत. आतापर्यंत १० माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

  • छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात मोठी चकमक.

  • या कारवाईत १० माओवादी ठार झाले.

  • १ कोटी रुपयांचं इनाम असलेला टॉप कमांडरही मारला गेलाय.

छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक घडलीय. यात सुरक्षा दलाने १० मा माओवाद्यांचा खात्मा केलाय. या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला कमांडरही यात ठार झालाय. रायपूर रेंजचे महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिलीय, सुरक्षा दल माओवादविरोधी कारवाईवर असताना मैनपूर पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात लपलेल्या माओवाद्यांमध्ये चकमक झाली.

दरम्यान माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये अधूनमधून गोळीबार होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार १० मओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मैनपूर परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), विशेष कार्य दल (STF) आणि जिल्हा दलाच्या कोब्रा बटालियनची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आली.

आज सकाळपासून या भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी सुरू आहे. आतापर्यंत १० माओवादी ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गरियाबंद जिल्ह्यातील ई ३०, एसटीएफ आणि कोब्रा बटालियनच्या सैनिकांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक झाली. गरियाबंदचे एसपी निखिल राखेचा सतत सैनिकांच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी कमांडर बालकृष्ण मारला गेला आहे. तो ओडिशा राज्य समितीचा एक मोठा नक्षलवादी होता.

नक्षल कमांडर बालकृष्ण हा छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सक्रिय होता. तो नेहमी त्याच्यासोबत एके ४७ बाळगत असायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आशा आहे की ही कारवाई या भागात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना मोठा धक्का असणार आहे. याआधी गरियाबंद जिल्ह्यातच नक्षलवादी सीसीचा प्रमुख सदस्य चालपती मारला गेला होता. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT