Charlie Kirk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या, भाषण सुरू असताना गोळीबार; थरकाप उडवणारा VIDEO

Charlie Kirk Shot Dead: अमेरिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. भाषण सुरू असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Charlie Kirk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या, भाषण सुरू असताना गोळीबार; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Charlie KirkSaam Tv
Published On

Summary -

  • ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची हत्या करण्यात आली.

  • युटा व्हॅली विद्यापीठात भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

  • मानेवर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

अमेरिकेतील रूढीवादी युवा नेते आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क (३१ वर्षे) यांची हत्या करण्यात आली. एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चार्ली कर्क यांचा मृत्यू झाला. कर्क हे उटाह व्हॅली विद्यापीठातील एका कार्यक्रमात भाषण देत होते. त्याचवेळी अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत कर्क यांच्या हत्येबाबत दु:ख व्यक्त केले. चार्ली कर्क यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Charlie Kirk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या, भाषण सुरू असताना गोळीबार; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

उटाहचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स यांनी कर्क यांच्या हत्येला राजकीय हत्या म्हटले आहे. चार्ली कर्क यांच्या हत्येमुळे संपूर्ण अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराच्या घटनांमुळे जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तरुण रिपब्लिक मतदारांना एकत्र करण्यात चार्ली कर्क यांनी प्रभावी भूमिका बजावली. कर्क हे इस्राइलचे कट्टर समर्थक होते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर चार्ली कर्क यांच्या हत्येबाबत दु:ख व्यक्त करत लिहिले की, 'महान आणि दिग्गज चार्ली कर्क यांचे निधन झाले आहे. अमेरिकेतील तरुणांचे हृदय चार्लीपेक्षा चांगले कोणीही समजू शकले नसते.' युटाचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स यांनी या दिवसाला राज्यासाठी काळा दिवस म्हटले. ते म्हणाले, 'हा आपल्या देशासाठी सर्वात दुःखद दिवस आहे. मी स्पष्टपणे सांगतो की ही एक राजकीय हत्या आहे.'

३१ वर्षीय कर्क 'अमेरिकन कमबॅक टूर' अंतर्गत महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये भाषण देत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबाराप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गोळीबारादरम्यान कर्क यांच्या मानेवर गोळी लागली आणि ते बसल्या जागीच खाली पडले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चार्ली कर्क स्टेजवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. याचवेळी गर्दीतून त्यांच्या दिशेने एक जण गोळीबार करतो. त्यांच्या मानेवर गोळी लागते आणि खाली पडतात. या गोळीबारामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते.

Charlie Kirk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या, भाषण सुरू असताना गोळीबार; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवलं, भारतावर बेरोजगारीचं संकट?

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गोळीबारानंतर मानेवर गोळी लागल्यामुळे चार्ली कर्क रक्ताच्या थारोळ्यात पडतात. त्यांच्यावर फक्त एकच गोळी झाडण्यात आली. गोळीबाराच्या घटनेआधी चार्ली कर्क सभास्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सामूहिक गोळीबार आणि बंदुकीच्या हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारत होते. युटा व्हॅली विद्यापीठाने सांगितले की, या गोळीबाराच्या घटनेनंतर कॅम्पस ताबडतोब रिकामा करण्यात आला. त्यानंतर कॅम्पस बंद करण्यात आला. या घटनेमुळे अमेरिकेमध्ये राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्यासह सर्वच डेमोक्रॅटिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

Charlie Kirk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या, भाषण सुरू असताना गोळीबार; पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवलं, भारतावर बेरोजगारीचं संकट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com