BILASPUR MURDER CASE: GYM OWNER NIKHIL GOSWAMI BRUTALLY KILLED, LOVE ANGLE UNDER POLICE SCANNER Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कदायक! डोळ्यात मिरची पूड टाकली, दगडाने डोकं ठेचून जिम मालकाची निर्घृण हत्या

Chhattisgarh Nikhil Goswami Murder : छत्तीसगडमध्ये जिम मालक निखिल गोस्वामीची निर्घृण हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हत्या करण्यात आली असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये धक्कादायक घटना

  • जिम मालक निखिल गोस्वामी यांची निर्घृण हत्या

  • निखिलचा उपचारादरम्यान मृत्यू

  • जुन्या वादातून हत्या, आरोपीला अटक

Chhattisgarh Nikhil Goswami Murder Case Update News छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिम मालक आणि बार बाउन्सर असलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या क्षुल्लक कारणावरून करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोनी परिसरातील रहिवासी निखिल गोस्वामी हा बिलासपूरमधील एका बारमध्ये बाउन्सर म्हणून काम करत होता. त्याचबरोबर तो स्वतःची जिमही चालवत होता. गुरुवारी रात्री तो काही कामानिमित्त कोटा येथील आपल्या भाड्याच्या घरात आला होता. त्यावेळी तो काही मित्रांसोबत बसला असताना पाथर्रा गावातील भोला माणिकपुरी तेथे पोचला.

यावेळी भोला आणि निखिल या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने निखिलच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यानंतर आरोपीने जवळ पडलेल्या जड दगडाने त्याच्यावर वारंवार हल्ला केला. या हल्ल्यात निखिलच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात निखिलच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित मित्रांनी आणि कुटुंबीयांनी निखिलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सिम्स बिलासपूर येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मधुलिका सिंग, डीएसपी नुपूर उपाध्याय आणि कोटा पोलीस ठाण्याचे प्रभारी आकाश चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. प्राथमिक तपासात वैयक्तिक वाद आणि काही जुन्या मतभेदांचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT