Bijapur Encounter Google
देश विदेश

Bijapur News: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सापडले १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह

Bijapur Encounter: छत्तीसगडच्या बीजापूर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवली जात आहे.

Bharat Jadhav

नक्षलवाद्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत छत्तीसगड पोलीस दलाला मोठं यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर येथे पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गंगालूर पोलीस परिसरातील पीडिया जंगलात पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. निवडणुकीपूर्वी २९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आता १२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे, ही या वर्षातील दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.

चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेहांचं जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं त्यानंतर बीजापूर येथील पोलीस लाइनमध्ये आणण्यात आलं. या मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी पोलिसांना गंगालूर परिसरातील जंगलामध्ये मोठे नक्षलवाद्यांचे मोठे कॅडर पश्चिम बस्तर डिव्हीजनचे एसजेसी लेंगू, एसझेडसी चैतू विभागातील नक्षलवाद्यांचा म्होरक्या पापाराव दरभा, वेल्लासह इतर मुख्य नक्षली आल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याचं खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दंतेवाडा, बिजापूर आणि सुखमा जिल्ह्यातून डीआरजी, सीआरपीएफ, कोबरा आणि बस्तर फायटर घेऊन अनेक पथकं बनवण्यात आली आणि त्यांनी जंगलात तैनात करण्यात आले. नक्षलविरोधी मोहिमेचे नियोजन करून जंगलात सुमारे १२०० सैनिक पाठवण्यात आले. त्यानंतर या जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून पिडियाच्या जंगलात नक्षलवादी आणि बस्तर पोलीस दलामध्ये चकमक झाली. ही चकमक संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बंद झाली. चकमकीनंतर पोलिसांनी परिसरात केलेल्या शोधमोहिमे दरम्यान १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT