CHHATTISGARH HIGHWAY ACCIDENT: FOUR FAMILY MEMBERS KILLED AFTER SCOOTER RAMS PARKED TRUCK, CHILD CRITICAL Saam Tv
देश विदेश

Accident News : मामाच्या गावाला निघालेल्या मुलांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

Chhattisgarh Accident News Update : छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. उभ्या ट्रकला स्कूटरची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. एका ८ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर AIIMS रायपूरमध्ये उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • छत्तीसगडमध्ये भीषण अपघात

  • स्कूटर आणि ट्रकची समोरासमोर धडक

  • दोन बहिणी आणि दोन चिमुकल्या मुलींचा घटनास्थळीच मृत्यू

  • ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून AIIMS रायपूरमध्ये उपचार सुरू आहेत

छत्तीसगडमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. भरधाव वेगाने स्कुटरवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एका मुलगा गंभीर जखमी आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना दुर्ग जिल्ह्यातील कुम्हारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, रायपूरलगतच्या महामार्गावर घडला. अमृता निर्मळकर, तिची धाकटी बहीण लक्ष्मी निर्मळकर आणि त्यांची मुले एका स्कूटरवरून रायपूर येथे त्यांच्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान रायपूरलगतच्या महामार्गावर एका उभ्या असलेल्या ट्रकला स्कूटरची मागून धडक बसली.

धडक इतकी भीषण होती की अमृता, तिची बहीण लक्ष्मी आणि त्यांच्या ४ ते ७ वर्षांच्या दोन मुली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अमृताचा ८ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रायपूर येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सुपेला येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त केला असून चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावरही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री थरार, अंदाधुंद गोळीबारात एक जण गंभीर जखमी

Dia Mirza: 'लिप फिल कर, ब्रेस्ट साइज वाढवं...'; काम मिळवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाला धक्कादायक सल्ला

लांब केसांसाठी ५ सोपे उपाय| Long Hair Tips

Papaya leaf tablets: केमोथेरपीनंतर प्लेटलेट्स वाढवणाऱ्या पपईच्या गोळ्या घेताय? नवीन रिपोर्ट्समुळे चिंता वाढली

Abhijit Dipke : जंतर-मंतरवर राडा! आंदोलक अभिजीत दिपकेंवर महिलेने फेकली शाई, अर्वाच्य भाषेत शिवीगाळही

SCROLL FOR NEXT