Social Media Influencer Nagalakshmi Killed Saam Tv
देश विदेश

Shocking: सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरची निर्घृण हत्या, बायकोला संपवून नवऱ्याने केली आत्महत्या

Social Media Influencer Nagalakshmi Killed: चेन्नईमध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरची नवऱ्याने हत्या केली. बायकोची हत्या करून नंतर त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे चेन्नईत खळबळ उडाली आहे. पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • चेन्नईमध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरची हत्या

  • नवऱ्याने तिची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय

  • दोघांचे मृतदेह घरात आढळून आले

  • कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज

तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेन्नईमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या करण्यात आली. नागालक्ष्मी असं या सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचं नाव होतं. तिच्या नवऱ्यानेच तिची हत्या करून आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. या घटनेमुळे चेन्नईमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नंगनल्लूर येथे हे नागालक्ष्मी आणि तिचा नवरा सुब्रमण्यम राहत होते. दोघेही घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले. नागालक्ष्मी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर होती. तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. नागालक्ष्मी इन्स्टाग्राम रिल्स तयार करून साड्या कशा नेसाव्यात याचे टिप्स द्यायची. कधीकधी या रिल्समधून तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही दिसायची. तसंच ती श्री साई साडीजची मालकीण होती. तिचे नंगनल्लूर आणि अण्णानगरमध्ये रेशमी साड्यांची दुकानं होती.

नागालक्ष्मीने आपल्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले होते. नागालक्ष्मी कुटुंबाची एकमेव कमावती व्यक्ती होती. तिला सुब्रमण्यमपासून दोन मुलं आहेत. तिचा मोठा मुलगा हरीश भारद्वाज (२१ वर्षे) रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तर तिचा धाकटा मुलगा शैलेश (१८ वर्षे) हा चेन्नईमध्ये दंतवैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत आहे. सुब्रमण्यम दोन वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता. पण अलीकडेच तो चेन्नईला परत आला. नागालक्ष्मी आणि त्याच्या बायकोमधील मतभेद मिटले आणि ते एकत्र राहू लागले. पण काही काळानंतर त्यांच्यात भांडणे सुरू झाली.

२७ एप्रिल रोजी त्यांच्या धाकट्या मुलाला घरात त्याच्या आई-वडिलांचे मृतदेह आढळले. वडिलांकडून एक चिंताजनक मेसेज मिळाल्यानंतर तो घाईघाईने घरी आला होता. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. नवरा-बायकोंमधील भांडणामुळे सुब्रमण्यमने नागालक्ष्मीची हत्या करून नंतर आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उमरखेडमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

SCROLL FOR NEXT