Chaos in West Bengal Assembly Saam
देश विदेश

विधानसभेत राडा! भाजप आमदाराला खेचून बाहेर काढलं, बेशुद्ध होऊन खाली पडले, ३ आमदार सस्पेंड

TMC-BJP Clash in Assembly: पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. भाजपच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला.

  • भाजपच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आलं.

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी भाजपच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आलं. मुख्य प्रतोद शंकर घोष यांनी बाहेर जाण्यास नकार दिल्याने मार्शल्सना बोलावण्यात आलं आणि त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. या गोंधळादरम्यान घोष यांना भोवळ आली आणि त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ठराव मांडला होता. या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष भाजपने घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रस्तावावर बोलणार होत्या. त्यावेळी भाजप आमदारांनी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी केली. याला तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला.

गदारोळ वाढताच विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपावरून भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना सभागृहातून निलंबित केले. मात्र, घोष यांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला. यामुळे मार्शल्स अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांना जबरदस्तीने बाहेर खेचण्यात आले.

या धक्काबुक्कीत शंकर घोष बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलवण्यात आले. याशिवाय भाजपचे आणखी २ आमदार अग्निमित्रा पॉल आणि मिहिर गोस्वामी यांनाही सभागृहातून निलंबित करण्यात आले.

या घटनेनंतर भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. 'आज पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुलाम प्रशासनाने लोकशाहीची हत्या केली आहे', असा गंभीर आणि थेट आरोप केला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन १ सप्टेंबरपासून सुरू झालं होतं. गुरूवार हा अधिवेशनाचा शेवटचा ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Thursday Horoscope: काहींना प्रवासातून लाभ, काहींना पैशांची तंगी जाणवणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

SCROLL FOR NEXT