Chandrayaan-3 Mission Latest News Saam Tv
देश विदेश

Chandrayaan 3 Team: ऐतिहासिक क्षण जवळ येतोय; चांद्रयान-3 मोहिमेचे खरे हिरो कोण? जाणून घ्या

Chandrayaan 3 Team: चांद्रयान-३ मोहिमेचं काम इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वात टीम या मिशनसाठी काम करत आहे.

Vishal Gangurde

Chandrayaan 3 Team:

चांद्रयान-३ आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग करत इतिहास रचणार आहे. या सॉफ्ट लँडिगनंतर भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. याधी अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी चंद्रावर यान पाठवलं आहे. या चांद्रयान-३ मोहिमेचं काम इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वात टीम या मिशनसाठी काम करत आहे. (Latest Marathi News)

चांद्रयान-३ मोहिमेसाठी मागील २ वर्षे ९ महिने १४ अहोरात्र मेहनत घेण्यात आली. इस्रोच्या कामगिरीमुळे भारत नवा इतिहास रचणार आहे. या मिशनचे खरे हिरो कोण आहेत, जाणून घेऊयात.

डॉ. एस. सोमनाथ

डॉ. एस सोमनाथ हे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था ) इस्रोचे अध्यक्ष आहेत. तसेच या मोहिमेचे प्रमुख आहेत. त्यांनी मिशनसाठी रॉकेटचे 'लॉन्च व्हीकल' तयार केले आहेत. त्याच्या मदतीनेच रॉकेट लाँच करण्यात आलं आहे. डॉ. एस सोमनाथ यांना या मोहिमेची गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जबाबदारी मिळाली होती. त्याच्या नेतृत्वात टीम काम करत आहे.

पी. वीरमुथुवेल

पी. वीरमुथुवेल यांनी या मोहिमेची प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कमान सांभाळली. त्यांना २०१९ मध्ये या मिशनची जबाबदारी दिली होती. ते याआधी इस्रोच्या अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यलयात उपसंचालक होते. त्यांना चांद्रयान-२ मोहिमेचीही जबाबदारी दिली होती. वीरमुथुवेल हे तामिळनाडूचे आहेत. त्यांनी आयआयटी मद्रासमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.

एस उन्नीकृष्णन नायर

एस उन्नीकृष्णन नायर हे देखील चांद्रयान-३ मोहिमेचे महत्वाचे शिलेदार आहेत. त्यांच्यावर 'रॉकेट डेव्हलपमेंट'ची जबाबदारी होती. तसेच ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे डायरेक्टर आहेत. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' या संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.

एम शंकरन

एम शंकरन हे यूआरएससीचे डायरेक्टर आहेत. त्यांच्यावर सॅटेलाईट तयार करणे आणि डिझाईनची जबाबदारी होती. एम शंकरन यांच्या नेतृत्वात टीम उपग्रह संप्रेषण, नेव्हिगेशन, रिमोट वर्किंग, हवामान अंदाज आणि ग्रहांचा शोध घेत आहे. एम शंकरन यांनी १९८६ मध्ये भारतीदासन विद्यापीठ, तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलं.

डॉ. के. कल्पना

डॉ. के. कल्पना या चांद्रयान-३ मोहिमेच्या उप प्रकल्प संचालक (डिप्टी प्रोजेक्ट डायरेक्टर) आहेत. त्या अनेक वर्षांपासून या मोहिमेसाठी काम करत आहेत. कोराना काळातही त्यांनी मोहिमेचं काम सुरू ठेवलं होतं. या मोहिमेसाठी गेल्या चार वर्षांपासून काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT