Chandrayaan 3 Landing Saam Tv
देश विदेश

Chandrayaan 3 Landing Update: आज चांद्रयान-३ चं लँडिंग झालं नाही तर?, इस्रोकडे आहेत महत्वाचे ३ पर्याय

Chandrayaan 3 News: चांद्रयान 3 चे (Chandrayaan 3) आज चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यात येणार आहे. यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे.

Priya More

Chandrayaan 3 Update : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोची (ISRO) महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीम (Mission Chandrayaan 3) आज इतिहास रचणार आहे. चांद्रयान 3 चे (Chandrayaan 3) आज चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यात येणार आहे. यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. आजचा हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्वाचा आहे. अशामध्ये जर चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग (Chandrayaan 3 Landing) झाले नाही तर इस्रोकडे तीन पर्याय आहेत.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सॉफ्ट लँडिंगची नियोजित तारीख आणि वेळ चुकण्याची शक्यता कमी आहे. चांद्रयान-२ मध्ये काय चूक झाली हे लक्षात घेऊन चांद्रयान-३ अयशस्वी-सुरक्षित पद्धतीने विकसित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी हे देखील सांगितले होते की, चांद्रयान-३ चे सर्व सेन्सर निकामी झाले, दोन्ही इंजिन बंद पडले तरी देखील विक्रम लँडिंग करेल. पण जर चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाले नाही तर इस्रोकडे काही पर्याय आहेत.

१. आज लँडिंग झाले नाही तर २४ ऑगस्ट रोजी दुसरा सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न-

जर काही कारणास्तव चांद्रयान-३ चे आज संध्याकाळी चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले नाही तर इस्रोकडून २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगचा दुसरा प्रयत्न केला जाईल. आज संध्याकाळी ५.४५ वाजता अंतर्गत तपासणी केल्यानंतर आणि चंद्रावर सूर्य उगवल्यावर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया संध्याकाळी ५:४५ वाजता सुरू होईल आणि १७ मिनिटं चालेल. ज्यामध्ये लँडर त्याचे इंजिन सुरू करेल आणि लँडिंगची तयारी करेल.

लँडिंगसाठी, अंतराळ यान क्षैतिजपासून उभे असावे लागेल. लँडिंगपूर्वी ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असेल. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,'जर सर्व काही बिघडले. जर सर्व सेन्सर निकामी झाले, काहीही काम करत नसेल तरीही विक्रम लँडिंग करेल. हे अशा प्रकारे डिझाइन केले आहे. आम्ही हे देखील सुनिश्चित केले आहे की, या वेळी विक्रममध्ये दोन्ही इंजिन बंद पडले तरीही ते उतरण्यास सक्षम असेल.

२. आज आणि उद्या लँडिंग झाले नाही तर पुढील चंद्र सूर्योदय होईपर्यंत प्रतीक्षा करणार -

जर चांद्रयान -३ चे सॉफ्ट लँडिंग आज झाले नाही तर आणखी प्रयत्नांसाठी खिडकी १४ दिवसांपर्यंत उघडी राहील. कारण एक चंद्र दिवस 14 पृथ्वी दिवसांच्या बरोबरीचा असतो. जेव्हा सूर्य चंद्रावर उगवेल तेव्हा पुढील खिडकी उघडेल. हे १४ दिवसांनंतर, म्हणजे 7 सप्टेंबरच्या आसपास शक्य होईल.

३. तोपर्यंत चांद्रयान-३ सध्याच्या जागेवर फिरत राहिल -

चांद्रयान-३ लँडिंगसाठी पुढील प्रयत्नाची वाट पाहिल. तोपर्यंत ते त्याच्या सध्याच्या 25KmX134Km च्या कक्षेत फिरत राहिल. मागील वेळी चांद्रयान-२ अयशस्वी झाले होते जेव्हा लँडर पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकत नव्हते. चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी उंचीवर असताना लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला होता. ते ७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT