Railway Bridge Collapses: बांधकाम सुरू असताना रेल्वे पूल कोसळला; १७ कामगारांचा जागीच मृत्यू, अनेकजण दबल्याची भीती

Mizoram Railway Bridge Collapses: मिझोराममध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
mizoram Railway Bridge Collapses 17 laborers death on the spot many injured
mizoram Railway Bridge Collapses 17 laborers death on the spot many injured Saam TV
Published On

Mizoram Railway Bridge Collapses: मिझोराममधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे. (Latest Marathi News)

mizoram Railway Bridge Collapses 17 laborers death on the spot many injured
Solapur Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ४ महिला भाविकांचा जागीच मृत्यू

वृत्तानुसार, हा रेल्वे पूल सायरंगजवळ कुरुंग नदीवर बांधला जात होता. त्यामुळे बैराबी आणि सायरंग भागातील संपर्क तुटला आहे. खाली पडलेल्या रेल्वे पुलाच्या खांबाची उंची सुमारे 104 मीटर इतकी होती. म्हणजेच हा पूल कुतुबमिनारच्या उंचीपेक्षा 42 मीटर जास्त उंचीचा होता.

घटनेबाबत ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे यांनी सांगितले की, अपघातानंतर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. अजूनही ३० ते ४० मजूर पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. ऐजॉलजवळील सैरांग येथे बांधकाम सुरू असलेला रेल्वेपूल कोसळून त्यात १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत दिल्या जाईल, तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं थांगा यांनी सांगितलं आहे.

केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीही ट्वीट मिझोरम रेल्वे पूल दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “मिझोरममधील पूल दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रति मी मी शोक व्यक्त करतो, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करू, असं मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMMRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जे जखमी झाले आहेत त्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com