संपूर्ण जगाचं लक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर इस्रोच्या चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगकडे लागले आहेत. विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवतील. इस्रोने याबाबत सांगितलं की, सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे, कुठेही अडचण नाही. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग ISRO आणि भारतासाठी महत्त्वाचे आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर, चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हर एनर्जीसाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतील. उपकरणांना चार्ज राहण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. जेणेकरुन सूर्यप्रकाशाच्या मदतीने चांद्रयानचे रोव्हर चार्ज होत राहील आणि आपले मिशन यशस्वीपणे पूर्ण करू शकेल. (Latest News Update)
चंद्रावर 14 दिवसांचा दिवस असतो आणि पुढील 14 दिवस रात्र असते. चंद्रावरील दिवस खूप उष्ण असते आणि रात्र खूप थंड असते. दक्षिण ध्रुवावर तापमान रात्री उणे 230 अंशांवरही जाते. 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर दिवस सुरू होईल. त्यामुळे चांद्रयान अशा वेळी चंद्रावर उतरेल जेव्हा 14 दिवस सूर्यप्रकाश असेल. दिवसाच्या प्रकाशात चंद्राचे फोटो चांगले येतील. जेणेकरून संशोधनात फायदा होईल.
अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या 2 तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.