Chandrayaan 3 Update : चांद्रयान-३ च्या लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास काय? इस्रोचा 'प्लान बी' आला समोर

Chandrayaan-3 live location today : चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसह, अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल.
Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 Update Saam TV

Chandrayaan 3 News :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ची चांद्रयान-3 मोहिम अंतिम टप्प्यात आहे. आज 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. या मोहिमेच्या यशाने भारत अवकाश क्षेत्रात मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसह, अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश असेल.

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशभराता प्रार्थना केल्या जात आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचं लक्षही आता विक्रम लँडरकडे लागलं आहे. आज संध्याकाळी 6.04 वाजता लँडर चंद्रावर उतरणार आहे. मात्र काही अडचण असल्याची इस्रोने प्लान बी देखील तयार ठेवला आहे.

Chandrayaan-3 Update
Chandrayaan 3 Update : ISRO ने शेअर केला चंद्राचा आणखी एक व्हिडीओ, चांद्रयान 3 मोहिमेबाबतही दिली अपडेट

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं?

अहमदाबादमधील  इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या 2 तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल. (Latest News Update)

Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 Mission: प्रतीक्षा चंद्रस्पर्शाची! भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस; विक्रम लँडर चंद्रावर उतरणार

शेवटचे 2 तास महत्त्वाचे

नीलेश देसाई यांनी सांगितलं की, लँडर 23 ऑगस्टला चंद्रापासून 30 किमी अंतरावरुन चंद्रावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळी लँडरचा स्पीड 1.68 किमी प्रति सेकंद असेल. हा वेग खूप जास्त आहे. त्याआधी 2 तास आम्ही सर्व कमांड लँडर मॉड्युलला दिल्या जातील. सर्व काही तांत्रिक गोष्टी तपासू दोन तास आधीच आम्ही निर्णय घेऊ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com