Chandrashkear Azad Ravan  SaamTvNews
देश विदेश

मोठा गाजावाजा करत योगींविरोधात लढलेल्या चंद्रशेखर रावण यांना अवघी ७ हजार मते

युपीमधील ४०३ जागांवर आझाद समाज पार्टीने उमेदवार उभे केले होते.

Krushnarav Sathe

Election Result गोरखपूर : देशात उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून नवा रेकॉर्ड तयार केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे तीन वेळा विधान परिषद आमदार होते. त्यांनी यंदा पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांची हि निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात होती. (Chandrashekar Azad ravan Latest News)

हे देखील पहा :

योगी आदित्यनाथ यांनी 'हॉट सीट' ठरलेल्या गोरखपूर विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भाजपने (BJP) पहिल्यांदाच ही जागा एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकली आहे. गोरखपूर (Gorakhpur) शहर मतदारसंघातील मतमोजणीच्या ३४ फेऱ्यांमध्ये आदित्यनाथ यांना १६२९६१ मते मिळाली. त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी सपाच्या सुभावती शुक्ला यांचा १०२३९९ मतांनी पराभव केला. सुभावती यांना ६०५६२ मते मिळाली. या जागेवर बसपाचे उमेदवार शमशुद्दीन यांना ७८३३ तर काँग्रेसच्या चेतना पांडे यांना २७३१ मते मिळाली. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 810 मते मिळाली.

तर, मोठा गाजावाजा करून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या भीम आर्मी (Bhim Army) चीफ, आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर रावण (Chandrashekhar Ravan) यांना अवघ्या ७४५४ मतांवर समाधान मानावे लागले आहे. गोरखपूर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज केल्यांनतर चंद्रशेखर रावण यांनी मोठमोठे दावे केले होते. युपीमधील ४०३ जागांवर आझाद समाज पार्टीने उमेदवार उभे केले होते. आझाद समाज पार्टी अनेक जागांवर विजय मिळवून युपीमध्ये सगळ्यात मोठी राजकीय ताकद बनून पुढे येईल व कोणाचे सरकार बनणार हे ठरवेल असा दावाही आझाद यांनी केला होता. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच त्यांचे हे दावे फोल ठरल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : महायुतीने घेतला कांद्याचा धसका! निर्यात शुल्कात पुन्हा कपात

Mayavati News : ...तर बहुजन समाज पक्ष सरकारमध्ये सामील होणार; माजी मुख्यमंत्री मायावतींनी मोठे संकेत

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT