Chandrababu Naidu Party TDP to Join BJP Led NDA  Saam Tv
देश विदेश

BJP- TDP: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मिळाला नवा मित्रपक्ष, टीडीपी एनडीए आघाडी सामील

Lok Sabha Election 2024: देसम पार्टी (TDP) आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्ष (JSP) हे भाजपसोबत युती करत एनडीए आघाडीत सामील झाले आहेत.

Satish Kengar

Lok Sabha Election 2024:

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडी सातत्याने नवीन पक्ष जोडले जात आहेत. यातच तेलगू देसम पार्टी (TDP) आणि पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष (JSP) हे भाजपसोबत युती करत एनडीए आघाडीत सामील झाले आहेत. याबाबत बोलताना टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले की, या आघाडीमुळे लोकसभा निवडणुका, तसेच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत होईल.

नायडू आणि शाह यांची झाली होती भेट

टीडीपीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती करण्याबाबत चर्चा केली होती. नायडू आणि जनसेना प्रमुख दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांनी गुरुवारी शाह आणि नड्डा यांची भेट घेतली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीडीपीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य के. रवींद्र कुमार यांनी शुक्रवारी सांगितले होते की, भाजप, जनसेना आणि त्यांच्या पक्षाने आगामी निवडणुकीत एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत काम करण्यासाठी कार्यपद्धती तयार केली जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी पाहिल्यास पक्षाने मिशन साऊथ मोडवर आधीच सुरु केलं आहे. अशातच जर आपण दक्षिण भारताबद्दल बोललो तर येथील 5 राज्यांमध्ये (केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) एकूण 129 जागा आहेत. येथे एनडीए काही प्रमाणात कमकुवत मानली जात असल्याने भाजप हायकमांड पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा अशा आहेत जिथे चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी यावेळी मोठी भूमिका बजावू शकते. अशातच टीडीपीची भाजपशी मैत्री खूप महत्त्वाची आहे. 400 चा आकडा गाठण्यासाठी नायडू आणि पवन कल्याण यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सामील होणे आवश्यक मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Himachal Flood : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ३७० जणांचा मृत्यू, ४३४ जण जखमी आणि ६१५ रस्ते बंद

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

Kitchen Hacks : भात शिजल्यावर चिकट होतो? आताच टाळा 'ही' चूक

SCROLL FOR NEXT