Chandipura Virus Saam Tv
देश विदेश

Chandipura Virus: पालकांनो, तुमच्या मुलांची काळजी घ्या! कोरोनानंतर चांदीपुरा व्हायरसचा कहर; 6 मुलांचा मृत्यू

Chandipura Virus Symptoms: कोरोनाचं संकट टळल्यानंतर देशावर आता नवं संकट घोंगावू लागलंय. हे संकट आहे चांदीपुरा व्हायरसचं...हा व्हायरस अत्यंत वेगानं पसरत असून तो लहान मुलांच्या जिवावर उठतोय. चांदीपुरा व्हायरसनं पालकवर्गाची चिंता वाढवलीय.

Mayuresh Kadav

कोरोनासारख्याच नव्या एका व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या जीवघेण्या व्हायरसचं नाव आहे, चांदीपुरा. हा व्हायरस लहान मुलांच्या मेंदूवर हल्ला करतोय. चांदीपुरा व्हायरसमुळे गुजरातमध्ये 6 चिमुकल्यांचा बळी गेलाय. त्यानंतर हा व्हायरस राजस्थानमध्ये हातपाय पसरू लागलाय.

राजस्थानात दोन लहान मुलांना चांदीपुराची लागण झालीय. यातील 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार चांदीपुरात हा एक अत्यंत घातक व्हायरस आहे. तो थेट मुलांच्या मेंदूवर हल्ला करतो.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणं

ताप येणं, अंग दुखणं हे चांदीपुराचं प्राथमिक लक्षण आहे. चांदीपुरामुळे लहान मुलांच्या मेंदूला सूज येते. मुल कोमात जाऊ शकतं किंवा मृत्यूही होऊ शकतो. हा व्हायरस मच्छर तसच छोट्या किड्यांमुळे पसरतो. पावसाळ्यात चांदीपुरा व्हायरस वेगानं पसरण्याची भीती असते.

'चांदीपुरा'ला रोखण्यासाठी काय काळजी घ्याल?

या व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल तर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. कुठेही पाणी साचू देऊ नका. मच्छर आणि किड्यांपासून बचाव करा. तोकडे कपडे घालू नका.

या व्हायरसला चांदीपुरा हेच नाव का पडलं. यामागचं कारण मात्र आपल्या महाराष्ट्रात दडलंय. 1964-65 मध्ये नागपुरातल्या चांदीपुरा गावात सर्वात आधी या व्हायरसचे रूग्ण आढळून आले होते. त्यापूर्वी हा व्हायरस जगात कुठेही नव्हता. त्यामुळे या व्हायरसला चांदीपुरा असं नाव देण्यात आलं. तब्बल 60 वर्षानंतर या व्हायरसनं पुन्हा डोकं वर काढलंय. गुजरात, राजस्थान आणि आंध्रात तो वेगानं पसरतोय. त्यामुळे महाराष्ट्रात कधी धडकेल ते सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनी वेळीच सावध होऊऩ काळजी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT