Man Discovers Grandfathers SBI Shares Saam Tv
देश विदेश

Shocking News: कपाटात सापडला ३० वर्षांपूर्वीचा एक कागद, डॉक्टर क्षणार्धात बनला मालामाल

Rohini Gudaghe

Chandigarh News Man Discovers Grandfathers Shares

चंदीगढमध्ये एका डॉक्टरला त्याच्या आजोबांनी खरेदी केलेले शेअर्स सापडले आहेत. हे शेअर्स त्याच्या आजोबांनी १९९४ मध्ये ५०० रूपयांना खरेदी केले होते. हे शेअर्स स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (Chandigarh News) आहेत. आज त्यांची किंमत लाखो रूपये आहे. यामुळे डॉक्टरला सुखद धक्का बसलेला आहे. १९९४ रूपयांच्या या शेअर्सची किंमत आता लाखो रूपये झाली आहे. (Latest Marathi News)

डॉ. तन्मय मोतीवाला एक बालरोग शल्यचिकित्सक आहेत. ते त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेचं नियोजन करत होते, तेव्हा त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सचं एक सर्टिफिकेट सापडलं. त्यामध्ये त्यांच्या आजोबांनी १९९४ मध्ये पाचशे रूपये किमतीचे एसबीआयचे शेअर्स (Man Discovers Grandfathers Shares) खरेदी केल्याचं आढळलं. त्यांच्या आजोबांनी ते विकलेले नव्हते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्यक्तीने सांगितलंय की, ते एसबीआयचे शेअर्स आता तीन लाख ७५ हजार रूपयांचे आहेत. यामुळे त्यांना तीन दशकांत 750 पट अधिक परतावा मिळत आहे. X वरील एका पोस्टमध्ये डॉ मोतीवाला यांनी लिहिलंय (Shocking News) की, माझ्या आजोबांनी १९९४ मध्ये SBI चे ५०० रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले होते. ते ही गोष्ट विसरले होते. एका ठिकाणी कुटुंबाचे कागदपत्र शोधताना मला ही प्रमाणपत्रे सापडली आहेत.

बऱ्याच लोकांनी त्यांना या शेअर्सच्या सध्याच्या मूल्यांकनाबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी लाभांश वगळता सुमारे तीन लाख ७५ हजार किंमत असल्याचं सांगितलं आहे.ते म्हणाले की, ही मोठी रक्कम (SBI Shares) नाही. पण, तीस वर्षांमध्ये ७५० पट रक्कम मिळाली आहे. यामुळे ते अतिशय आनंदी आहेत.

त्यांच्या पोस्टमध्ये, त्यांनी आपल्या कौटुंबिक स्टॉक प्रमाणपत्रांचं डीमॅटमध्ये रूपांतर कसं केलं, हे देखील स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी सल्लागाराची मदत घेतल्याचं सांगितलं ( Grandfathers SBI Shares) आहे. ते म्हणाले की, ही एक अतिशय किचकट आणि वेळखाऊ स्वरूपाची प्रक्रिया आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांना हे शेअर्स पुढे तसेच ठेवायचे आहेत. त्यांना विकायचे नाही.

आपण नेहमी ऐकतो की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खजिना गाडून ठेवला आहे. तो ज्याच्या नशिबात असेल त्याला सापडतो. खरं तर या डॉक्टरला असाच त्यांच्या आजोबांनी लपवून ठेवलेला खजिना सापडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT