Supreme Court  Saam TV
देश विदेश

Chandigarh Mayor Elections Update : चंदिगड महापौर निवडणुकीतील ८ मतं वैध, पुन्हा मतमोजणीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Supreme Court on Chandigarh Mayor Elections : महापौर निवडणुकीत जी 8 मते अवैध ठरली होती, ती मते देखील वैध ठरवली जाणार आहेत, असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

Chandigarh Elections :

चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारबद्दल सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक निर्देश देत पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश दिले. महापौर निवडणुकीत जी 8 मते अवैध ठरली होती, ती मते देखील वैध ठरवली जाणार आहेत. त्यानंतर त्याआधारे निकाल जाहीर केले जातील, असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीत रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिहने बॅलेट पेपरवर फुली मारल्याचं कबूल केलं होतं. रिटर्निंग ऑफिसरची चौकशी केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेदरम्यानचे सर्व व्हिडीओ आणि कागदपत्रे कोर्ट रूममध्ये मागवली होती. हे सर्व आता न्यायालयात देण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक कुलदीप कुमार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरने 8 मते अवैध ठरवल्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने त्या दिवशीच्या घटनेचा व्हिडिओही पाहिला. सर्वोच्च न्यायालयाने अनिल मसिह यांना बॅलेट पेपर दाखवला आणि ते बेकायदेशीर कसे आहे, याचे स्पष्टीकरण द्या असे सांगितले.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आम्ही पुन्हा महापौर निवडणूक होऊ देणार नाही, पण बेकायदेशीर मतपत्रिका वैध मानून मोजणीचे आदेश देत आहोत.

चंदीगड महापौर निवडणुकीतील रिटर्निंग अधिकारी अनिल मसिह निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT