Bihar Political news :  Saam tv
देश विदेश

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

Bihar Political news : बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री चिराग पासवान नाराज झाल्याची चर्चा आहे. चिराग पासवान यांनी भाजपची ऑफर नाकारली आहे.

Vishal Gangurde

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप्र प्रणित एनडीएची धावाधाव सुरु झाली आहे. मात्र, भाजप प्रणित एनडीएममध्ये जागावाटपावरून नाराजीनाट्य सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजपची ऑफर धुडकावली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या जनशक्ती पार्टीला २२ जागांची ऑफर दिली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजपची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे चिराग पासवान नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांची बिहारमध्ये भाजपकडे २५ ते ३० जागांची मागणी आहे. याच मुद्द्यावरून अरुण भारती यांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी, हुलास पांडे, खासदार शांभवी चौधरी यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते.

बैठकीत जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही. चिराग पासवान हे त्यांच्या मागणीवर अडून आहेत. पासवान यांच्या मागणीने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे दिग्गज नेते चिराग पासवान यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीला रवाना होण्याआधी पटनामध्ये रात्री उशिरा मंगल पांडेय आणि चिराग पासवान यांच्याशी चर्चा झाली. तर आज दिल्लीत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यांनद राय हे चिराग पासवान यांची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली हे., 'जुर्म करो मत, जुर्म सहो मत। जीना है तो मरना सीखो, कदम-कदम पर लड़ना सीखो', अशी कविता केंद्रीय मंत्री पासवान यांनी केली आहे.

दुसरीकडे हिदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी देखील जागावाटपावरून नाराज असल्याची चर्चा आहे. दोन दिग्गज नेते नाराज असल्याने बिहारमध्ये एनडीएत फूट पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT