Centre Pushes for Negotiations, CJP Turns Down Four Meeting Requests saam tv
देश विदेश

सरकारकडून २४ तासात ४ वेळा प्रस्ताव; नड्डांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात होणार चर्चा, CJPकडून मात्र नकार

Government sends Proposals To CJP For Talks: केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा स्वतः या संवादासाठी उपस्थित राहतील. चर्चेद्वारे आपण टप्प्याटप्प्याने तोडग्याकडे वाटचाल करू. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयाचं एक पाऊल आहे.मी तुम्हा सर्वांना नम्र आवाहन करतो की, तुम्ही पुढे यावे आणि संवादात सहभागी व्हावे, असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलंय.

Bharat Jadhav

पेपरफुटी प्रकरणात केंद्र सरकारनं सकाळी एका मोठा निर्णय घेतलाय. यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. आता 'कॉकरोच जनता पार्टी'च्या प्रतिनिधींना केंद्र सरकारने पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. बुधवार दुपारपासून ते गुरुवार दुपारपर्यंतच्या काळात त्यांच्या प्रतिनिधींकडे बैठकीसाठी चार वेळा अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आल्याचेही सरकारने सांगितलंय. (CJP rejects government dialogue proposal latest news)

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आणि सरकार चर्चेसाठी सदैव तयार आहे, कारण चर्चेतूनच मार्ग निघतात. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे असेही नमूद केले की, विद्यार्थी प्रतिनिधींची इच्छा असल्यास ही चर्चा नड्डाजींच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यालयात होऊ शकते.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, "आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी माध्यमांच्या माध्यमातून सरकारतर्फे नम्र आवाहन करू इच्छितो. आम्ही चर्चेसाठी सदैव तयार आहोत. सरकारची दारे खुली आहेत. आमच्या सर्व तरुण मित्रांसाठी हे एक खुले निमंत्रण आहे, तुमच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत."'आंदोलन आणि त्याशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितले.

आंदोलन आणि त्याशी निगडित प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार सज्ज आहे. ते म्हणाले, "आंदोलन आणि इतर संबंधित बाबींसह प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार असेल आणि चर्चेसाठी आवश्यक तितका वेळ देण्याची आमची तयारी असल्याचं मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.

कॉक्रोच जनता पक्षाच्या शिष्टमंडळासोबत होणाऱ्या चर्चेवेळी "देशाचे आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा तुमच्यासोबतच्या चर्चेत सहभागी असतील. मीही त्यांच्यासोबत तिथे असेन. याच चर्चेतून आपण एखाद्या तोडग्यापर्यंत पोहोचू शकू, असं केंद्रीय जितेंद्र सिंह म्हणाले. केवळ तोडग्यातूनच नवीन मार्ग निघू शकतो. चर्चा तुम्हाला हव्या त्याठिकाणी होऊ शकते. जर तुम्ही नड्डाजींच्या निवासस्थानाची सूचना केली. तर तिथे चर्चा होऊ शकते आणि जर तुम्ही कार्यालयाची सूचना केली, तर तिथेही ती होऊ शकते असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खड्ड्यांमुळे चाकणमधील उद्योग जाणार, 4 हजार कुटुंब रस्त्यावर येणार

नेत्यांच्या काड्या, शिवसेना फोडा, शिवसेना सरदारांचाच एकमेकांवर गद्दारीचा आरोप

Fact Check: सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाची नवी योजना?

महाराष्ट्रात 5 वर्षांत 36,000 कंपन्या बंद, केंद्र सरकारची लोकसभेत धक्कादायक माहिती

देवेंद्रदारी वर्षा बंगल्यावर 'राज'कारण, दोन्ही नेत्यांमध्ये 'वर्षा'वर खलबतं?

SCROLL FOR NEXT