Shipping Corporation Of India
Shipping Corporation Of India Saam tv
देश विदेश

Privatization in India:केंद्र सरकार विकणार 'ही' कंपनी, मे महिन्यात बोली लागणार; कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Privatization of Shipping Corp: सरकार आता शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला (Shipping Corporation Of India) विकण्यासाठी खासगी कंपन्यांना आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. सरकारी कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे. खासगीकरणाच्या या वृत्तानंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ झाली आहे.

सरकार मे महिन्याच्या मध्यापर्यंत SCIL खाजगीकरणासाठी खासगी कंपनींना आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. मात्र सरकारने याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही. मात्र अंतिम निर्णय 14 एप्रिल रोजी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. (Latest Marathi News)

नोव्हेंबर 2019 मध्येच आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने शिपिंग कॉर्पोरेशनची विक्री करण्यास तत्वतः मान्यता दिली होती. पण कोरोना संकटामुळे ही प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही.

शेअर्समध्ये आली तेजी

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेअर्स मंगळवारी 4.94 रुपयांच्या वाढीसह वरच्या सर्किटला आले आहे. आज या कंपनीचे शेअर्स 81 रुपयांच्या किमतीसह उघडले पुढे 84.95 रुपयांचा उच्चांक गाठला.

गेल्या पाच दिवसांत एससीआयएलचे शेअर्स 6.13 टक्क्यांनी घसरले आहेत. तर गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 33.35 टक्क्यांनी घसरला आहे. स्टॉकमध्ये सहा महिन्यांत 28.52 टक्के आणि गेल्या एका वर्षात 34.17 टक्के घट झाली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा स्टॉक 22.67 टक्क्यांनी वाढला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 151.40 रुपये असून आणि नीचांकी 79.20 रुपये आहे.

कधी झाली कंपनीची स्थापना?

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना 2 ऑक्टोबर 1961 रोजी झाली. 18 सप्टेंबर 1992 रोजी कंपनीचा दर्जा 'प्रायव्हेट लिमिटेड' वरून 'पब्लिक लिमिटेड' असा बदलण्यात आला. कंपनीला 24 फेब्रुवारी 2000 रोजी भारत सरकारने 'मिनी रत्न' ही पदवी प्रदान केली होती. केवळ 19 जहाजांसह एक लाइनर शिपिंग कंपनी म्हणून सुरू केलेली SCIL कडे आता 83 पेक्षा जास्त DWT जहाजांची मालकी आहे. कंपनीकडे टँकर, बल्क कॅरिअर्स, लाइनर्स आणि ऑफशोअर सप्लाय आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bengaluru Video : खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला मिठीत घेत तरुणाचा प्रवास, VIDEO व्हायरल

Beed News : तुरीच्या बियाण्यातून फसवणूक; ३ वर्ष लढला व जिंकलाही, कोर्टाने दिले भरपाईचे आदेश

Aaditya Thackeray: मतदान केंद्राबाहेर असुविधा, अनेक तक्रारी; आदित्य ठाकरेंची X अकाउंटवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला विनंती

Maharashtra Election: मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

Health Tips: स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासायी 'या' सवयी पाळा

SCROLL FOR NEXT