Heatwave Warning Saam Tv News
देश विदेश

Heatwave Warning: देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

Weather Update in Marathi: देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचीच दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Central Government News:

देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचीच दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी मोठी बैठक घेतली.

यातआयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैठकीनंतर मनसुख मांडविया म्हणाले, “आयएमडीने या वर्षी एल निनोचा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता जास्त आहे. आयएमडीने म्हटले आहे की, या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. ते म्हणाले की, हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे आणि उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात टाळण्यासाठी मी, आयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह तपशीलवार आढावा घेतला आहे आणि केंद्राला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.''  (Latest Marathi News)

हवामान विभागाने मंगळवारी दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल ते जून या काळात देशभरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, ज्याचा मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांवर गंभीर परिणाम होईल.

केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्यात जेवढे तापमान दिसून येते त्यापेक्षा यंदाचे तापमान जास्त असेल. या पार्श्वभूमीवर जनतेला विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते म्हणाले की, यंदा तुम्ही निवडणूक प्रचारासाठी जाल तेव्हा पिण्याचे पाणी ठेवा आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा. लोकांनी वेळोवेळी पिण्याच्या पाण्यासोबत ज्यूसचे सेवन करावे. याशिवाय लिंबू पाणी प्यावे. उन्हाळ्यात मिळणारी फळेही खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT