Central Government Bonus Saam Tv
देश विदेश

Central Government Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवळीचं गिफ्ट, महिन्याच्या पगाराइतका मिळणार बोनस, वाचा पात्रता अन् अटी?

Central Government Bonus Annoucement: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने बोनसची घोषणा केली आहे. आता कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटीवर आधारित बोनस मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता बोनसची घोषणा करण्यात आली आहे. मोदी सरकारने प्रोडक्टिव्हिटी (उत्पादकता) संबंधित बोनसची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत सोमवारी घोषणा केली. त्यांनी सोमावारी यासंदर्भात आदेश जारी केले

केंद्र सरकारच्या गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे. ही रक्कम ६,९०८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा बोनस ३१ मार्च २०२५ पर्यंत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि ६ महिने सतत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. जर तुम्ही संपूर्ण वर्षभर काम केले तर त्यांना महिन्यांच्या आधारावर बोनस मिळणार आहे. तुम्हाला उत्पादकता संबंधित ३० दिवसांच्या पगाराएवढा अॅड हॉक बोनस मिळणार आहे.

लाभ कोणाला मिळणार?

बोनस ३१ मार्च २०२५ पर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि किमान सलग ६ महिने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल.

एखाद्याने जर वर्षभर काम केले तर त्याला त्याच्या प्रोडक्टिव्हिटी म्हणजे (काम केलेल्या महिन्यानुसार) बोनस दिला जाईल.

केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळणार

केंद्रशासित प्रदेशातील केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर जे कर्मचारी काम करतात त्यांनादेखील बोनल मिळेल.

सेवेत कोणताही ब्रेक न घेता काम करणाऱ्या अॅड हॉक कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षात ठरावीक दिवस काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोल मिळणार आहे. हा बोनल १,१८४ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

बोनस कसा मोजला जाणार?

तुमच्या कमाल पगारावर ७००० रुपयांवर हा बोनस दिला जाईल.

७०००x३०÷३०.४= ६,९०७.७९ रुपये तुम्हाला मिळणार आहेत. याचा फाया लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याना होणार आहे. यामुळे यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Highest Bridge: दोन तासांचा प्रवास , दोन मिनिटांत; जगातील सर्वात मोठ्या ब्रीजचे फोटो समोर

Maharashtra Flood: शेतकऱ्यांसाठी पुढच्या २ दिवसांत ठोस निर्णय घेणार, उमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

स्पेसक्राफ्ट एका दिवसात किती फेऱ्या मारतं?

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

SCROLL FOR NEXT