Onion News Saam Tv
देश विदेश

Afghani Onion Import : अफगाणिस्तानाच्या कांद्याची भारतात एन्ट्री; केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, VIDEO

साम टिव्ही

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : लोकसभेला फटका बसल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला काही दिवस होत नाहीत तोच कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने थेट अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याने कांद्याचे दरात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 60 ते 70 रुपयांवर पोहचले आहेत. त्यातच सरकारने नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्ली, मुंबई,चेन्नई, भुवनेश्वर आणि कोलकाता या शहरांमध्ये 30 ते 35 रुपये किलोने विकण्यास सुरुवात केलीय. मात्र कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने कांदा आयात करण्यात आल्याची माहिती सरकारने दिलीय.

तर आतापर्यंत अफगाणिस्तानातून 300 टन कांदा भारतात दाखल झालाय. तर 40-45 ट्रक कांदा भारत-अफगाणिस्तान बॉर्डरवर पोहचलाय.. हा कांदा भारतात दाखल झाल्यानंतर 10 ते 20 रुपयांनी कांद्याचे दर गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांनीही सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.

कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलीय. लोकसभेत कांदा निर्यातीनं महायुतीला रडवलं होतं. मात्र आता विधानसभेत कांदा आयात रडवणार की सरकार माघार घेणार याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल

Israel Lebanon War: पश्चिम आशियात युद्धाचा भडका, इस्त्राईल-लेबनॉन संघर्ष कधी थांबणार?

Pune Crime: करणी केली आर्थिक प्रगती होत नाही; मग संधी साधत डोक्यात घातला दगड,भोर तालुक्यात घडला भयानक प्रकार

Maharashtra Politics: मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल, अमित शहा यांची कार्यकर्त्यांना कानपिचक्या; VIDEO

Health Tips: रिकाम्या पोटी खा २ लवंग, फायदे ऐकून व्हाल चकीत

SCROLL FOR NEXT