Onion Import News: भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधून आयात; केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा संताप

Afghanistan Onion Import: अशातच कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Onion Import News: भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधून आयात; केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा संताप
Onion NewsSaam Tv
Published On

नाशिक, ता. २५ सप्टेंबर

Afghanistan Onion Import: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवल्यानंतर कांद्याचे दर चांगलेच वाढत आहेत. सध्या सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलो आहे. कांद्याच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे, अशातच कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Onion Import News: भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधून आयात; केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा संताप
Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.. केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयातीला सुरुवात ही केली असून पंजाबमधील अमृतसर, जालंधर शहरांमध्ये जवळपास ३०० टन कांदा आयात करण्यात आला आहे. तसेच सीमेवर आणखी ५० ट्रकमध्ये तब्बल १५०० टन कांदा देशातील बाजारात येण्यासाठी तयार आहे.

अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी काही प्रमाणात घटणार असून कांद्याचे दर १० ते २० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयात सुरू केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली जात असून कांदा आयातीवर बंदी न घातल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Onion Import News: भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधून आयात; केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा संताप
Crime News: 'चिकनमध्ये मीठ जरा जास्त झालं...', नवऱ्याच्या तक्रारीने बायको चिडली; डोक्यात रॉड घालून पतीला संपवलं

दरम्यान, नाशिक जिल्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कांद्याला मनमाड परिसरात झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच रब्बीच्या कांद्याची लागवड केलेली असताना काल झालेल्या जोरदार पावसाने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले त्यामुळे लागवड केलेला कांदा पाण्याखाली आला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. 5 ते 7 हजार रुपये पायलीने खरेदीने केलेल्या कांदा रोपे त्यामुळे खराब होणार आहे,तर शेतात कापणी करून काढून ठेवलेला मका सुद्धा संपूर्ण पाण्यात भिजला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Onion Import News: भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानमधून आयात; केंद्राच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा संताप
Nashik Accident : ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवर पडला पाय, शिवशाही बसची ५ वाहनांना धडक; दोन वाहनांचा झाला चुराडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com