Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 24 september : आज मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीसह मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील उपोषण, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा दावा करण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी केलीय. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरचे राजकीय लाभार्थी कोण? असा सवाल या याचिकेच्या माध्यमातून गंभीर सवाल करण्यात आलाय.

अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने, पोर्स्टमॉर्टम अहवाल आला समोर

अक्षय शिंदेचा मृत्यू हा अती रक्तस्त्रावाने झाला. शवविच्छेदन अहवालात उलगडा झालाय. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं होतं. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय. सात तास सुरू होत शवविच्छेदन. संपूर्ण प्रक्रियेचं करण्यात आली व्हिडिओग्राफी करण्यात आलीय.

बीडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात; पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत

बीड शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू झालाय. यामुळे बीड शहरातील जिल्हा क्रीडा संकुलचे ग्राउंड पाण्याखाली गेले आहे. पूर्ण ग्राउंड मध्ये पाणीच पाणी साचले आहे. तर दुसरीकडे शहरातील रस्त्यावर देखील पाणीच पाणी झाल आहे. त्याचबरोबर या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक हे हिरवल जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन काढलं नाही तर काहींनी काढून ठेवलंय. यामुळे या सोयाबीनसह अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांचा भाजपच्या कार्यकर्ता संवाद, बैठकीला नेत्यांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये संभाजी नगरात कार्यकर्ता संवाद बैठक होत आहे. भाजपचे मंत्री, आमदार ,खासदार, पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मराठवाडा विभागाची कार्यकर्ता संवाद बैठक होत आहे. छत्रपती संभाजी नगरातील महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील रुख्मिणी हॉल येथे ही बैठक होत आहे.

Nana Patole : नाना पटोले आज रात्री दिल्लीला जाणार, विधानसभा जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता

महाविकास आघाडी जागा वाटप तीन पक्ष नेते चर्चा करतात. पण मात्र काही जागांवर थेट उमेदवार मित्र पक्ष देत आहे, यावरून नाना पटोले पक्ष श्रेष्ठीसोबत चर्चा करणार असलयाची माहिती आहे.

Latur Rain: लातूर शहरात मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

लातूर शहरात मुसळधार पाऊस झाला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. तीन तास मुसळधार पाऊस झालाय. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद झालाय.

समाजाच्या विनंतीला मान देऊन धनगर उपोषणकर्त्यांचे १६व्या दिवशी आंदोलन स्थगित

समाजाच्या विनंतीला मान देऊन धनगर उपोषणकर्त्यांचे सोळाव्या दिवशी आंदोलन स्थगित झाले आहे. दीपक बोराडे यांनी याची घोषणा केलीय. उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यावर पंढरपूरवरून मुंबईकडे कूच करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. धनगर समाजाचा उमेदवार कुठल्याही पक्षातून उभा राहिला तर त्याचा प्रचार करणार असल्याचंही ते म्हणाले.

परभणी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

परभणी शहरासह तालुक्यात सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. दोन दिवसापासून परभणी जिल्हातील काही भागात पाऊस सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवस असाच पाऊस पडेल असा अंदाज कृषी विद्यापीठ परभणीकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोयाबीनची काढणी शेतकरी करत असल्याने पावसाने सोयाबीनचे नुकसान होणार आहे.

पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन येथे धनगर समाज बांधवाचे रास्ता रोको आंदोलन

धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी आणि पंढरपूर, लातूर, नेवासा, पुणे येथे आमरण उपोषणास बसलेले धनगर समाज बांधव यांच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा आणि सरकार याची दखल घेत एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी, यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता. २३) पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन येथील एलाईट चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उरुळी कांचन पंचक्रोशीतील तरडे, हिंगणगाव, मिरवडी, नांदूर, बुर्केगाव, खामगावटेक, कोरेगावमूळ, बोरीभडकयेथील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने पुढील ३ ते ४ तासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारा आणि पावसाचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान विभागाने येत्या २४ तासांत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता दर्शवली आहे.

बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा आरोप

बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुस-याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची त्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती. बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली जात आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, दाखल करण्यात आलीय यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. अक्षय शिंदेनं पोलीसांकडे मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचा याचिकेतून दावा करण्यात आलाय.

नाशिकमधील त्र्यंबकरोड पिनॅकल मॉलजवळ शिवशाही बसची 4 ते 5 वाहनांना धडक

शिवशाही चालकाचा ब्रेकच्या जागी एक्सेलटरवर पाय दाबल्या गेल्याने हा अपघात झाला. अपघातात कुठली ही जिवीत हानी नाही मात्र वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातात दोन बाईक चक्काचुर झालाय. शिवशाही बस खाली दोन दुचाकी अटकल्या आहेत. अपघातात एक महिला गंभीर जखमी झालीय.

Akshay Shinde Encounter :  न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका

एन्काऊंटर करणे हा मोठा गुन्हा. पोलीसांनी हा गुन्हा केलाय. बदलापुरमधील पिडीत मुलींसाठी आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. न्यालयामार्फत न्याय मिळायला हवा होता. तो मिळाला असता तर असे प्रकार घडला असता तर बदलापुरमधील घटनेनंतर नवीन नियम तयार होण्यास मदत झाली असती.या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी. स्वसंरक्षणार्थ गोळी चालवण्याबद्दल काही नियम आहेत.आधी पायावर गोळी मारायला हवी. अक्षय शिंदे मारला गेल्याचे अजिबात दुःख: नाही.मात्र कोर्टात न्याय झाला पाहिजे.
असीम सरोदे ,कायदेतज्ञ

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात शिवसेनेकडून पेढे वाटत,फटाके फोडत आनंदोत्सव साजरा

Summary

बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे या नराधमाचं ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे.आत्ता या प्रकरणावर राजकारण तापलं आहे.विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे.अश्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून फटाके वाजवत,पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र सरकार तसेच पुणे पोलिसांचा आभार मानण्यात आलं.

पुणे शहर शिवसेना पक्षाच्यावतीने पुण्यातील सारसबाग येथील कार्यालयाच्या बाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि विरोधकांकडून होत असलेल्या टिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.

Marathi Breaking Live : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली , डॉक्टर तपासणी साठी दाखल...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून त्यांची तब्येत खालवली आहे, मनोज जरांगे यांनी पाणी आणि सलाईन घ्यावी यसाठी उपस्थित महिला विनंती करत आहे. तसच जरांगे पाटिल यांच्या सहकाऱ्याकडून देखील जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती होत आहे. दरम्यान संभाजीनगरचे डॉक्टर आणि नारायणगडचे शिवाजी महाराज देखील आंदोलनास्थळी दाखल झाले आहे आणि ते मनोज जरांगे यांना पाणी आणि उपचार घेण्याची विनंती करत आहे.

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या शवविच्छेदनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग

अक्षय शिंदे यांचा शवविच्छेदण सुरुवात झालेले असतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं. या व्हिडिओ रेकॉर्डिंग नंतर अक्षय शिंदे याचे फिंगर प्रिंट्स हे देखील घेण्यात आलेले आहेत. पुढील तासाभरात अक्षय शिंदे यांचा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Rajkot Shivaji Maharaj Statue Case :  मालवण राजकोट पुतळा दुर्घटना, जयदीप आपटेचा पुन्हा जामिनावर अर्ज

मालवण राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणात जयदीप आपटेने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मालवण येथील दिवाणी न्यायालयाने जयदीप आपटेला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर जयदीप आपटेच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमध्ये दाखल 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर विमानतळावर दाखल होतात भर पावसात ढोल ताशाचा गजरात त्यांचा स्वागत करण्यात आला यावेळी भव्य पुष्प हार घालून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी तेही पावसाची तमांना बाळगता गाडीखाली उतरून त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला स्वागताचा स्वीकारलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यासोबत होते.

चकमकीत जहाल नक्षलवादी रूपेश मडावी ठार

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या 25 लाख रुपये इनामी जहाल नक्षली रुपेश मडावीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अबूझमाडच्या जंगलात काल छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले होते. यातील पुरुष नक्षलवाद्याची ओळख पटली असून गेली 20 वर्ष गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षली संघटनेत सक्रीय भूमिकेत असलेला रुपेश मडावी याचा समावेश आहे. तो नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक दहाचा कमांडर होता. त्याच्यावर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलीस जवानांच्या हत्येचा तो गुन्हेगार होता.

शहापूर : मानसिक त्रासातून विवाहितेची आत्महत्या चौघा विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पती आणि सासर्‍याला पोलिसांनी केली अटक

मुळशी घोटावडे फाटा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन

मुळशी: अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यासाठी सकल धनगर समाज भोर,राजगड,मुळशी यांच्या वतीने घोटावडे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.धनगर समाजाला अनुसुचित जमातीत आरक्षण असून ‘र‘ चा ‘ड’ झाला असून सरकारने दुरूस्ती करून जीआर काढावे व तात्काळ धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे जिल्हाधिकारी यांना द्यावेत आदी मागण्यांसाठी धनगर समाज रस्त्यावर उतारला होता.

फेक एन्काऊंटरची स्क्रिप्ट

ही फेक एन्काऊंटरची स्क्रिप्ट आहे मी प्रश्न उपस्थितीत केला आहे, मग फडणवीस यांनी काय केलं पाहिजे ९ एम एम चे पिस्तूल सामान्य माणसाला त्याचं लॉक उघडता येत नाही एस आय टी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट, माझाच बॉल असं झालं पोलिसांनी एक कपोकल्पित कथा कशी मानायची?, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नाही. कोणाला वाचवले जातेय आहे? -सुषमा अंधारे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून राज्यात २ सर्व्हे

Summary

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून राज्यात २ सर्व्हे

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला

यानंतर पक्षाकडून राज्यात करण्यात आलेल्या सर्हेत निगेटिव्ह रिपोर्ट

सध्या लाडकी बहीण योजनेचा राज्यातील अनेक महिलांना लाभ मिळाला

या योजनेनंतर करण्यात आलेल्या सर्व्हत पॅाझिटीव्ह रिपोर्ट

शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका न करणे, योजनांचा प्रसार करणे आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी घेत असलेल्या भूमिकांमुळे लोकांमध्ये पक्षाविषयी सकारात्मक भावना असल्याचे सर्व्हेत नमूद

पुढच्या महिन्यात पक्षाकडून आणखी एक सर्वे होणार

राज्यभरातील आमदारांचे स्थानिक पातळीवरील काम आणि लोकांमधील प्रतिमा याबाबत विचार करुन उमेदवारी जाहीर केली जाणार

सूत्रांची साम टिव्हीला माहिती

अक्षय शिंदे तळोजा मधून बदलापूर मध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं गेलं? संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हाथ होता. प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता. हा माणूस सस्पेंड होता. देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवला का? आपण नितेश राणे यांना समज देऊ शकला नाहीत. अक्षय शिंदे याला संपवल्युळे हे प्रकरण संपत नाही. कोणाला वाचवल्या जातेय आहे? ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे
सुषमा अंधारे

आदित्य ठाकरे यांचे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सरकारला सवाल

Summary

1) बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? त्यांना भाजप-मिंधे राजवट का संरक्षण देत आहे?

२) मिंधेचे स्थानिक पदाधिकारी वामन म्हात्रे यांनी एका पत्रकाराला प्रश्न विचारला की, ती स्वत:वर बलात्कार झाल्यासारखी घटना का विचारत आहे. त्याला संरक्षण का दिले जात आहे?

३) आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील खटले परत घेणार का? त्यांना गुंडांसारखी वागणूक दिली जात होती. ते फक्त आठवडाभर पीडितेची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन करत होते?

पोलीस स्टेशन कोणाचे संरक्षण करत होते?

शाळेच्या विश्वस्तांचा भाजपशी संबंध असल्याचे समजते. आणि त्यांचे संरक्षण केले जात आहे. ते खरे आहे का?

पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनचे नाव बदलून महात्मा फुले मंडई असे नाव करावे,  माळी महासंघाचे आंदोलन

Marathi Breaking Live : मालवण राजकोट येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू

राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे. राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या. शिवपुतळा घाईगडबडीत उभारण्यात आल्याची टीका अनेकांनी केली होती. राज्य शासनाच्या वतीने नव्याने शिवपुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याचा रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे.

अमित शहा 62 विधानसभा मतदारसंघातील प्रमुखासोबत साधणार संवाद

देशाचे गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहे. नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीत विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा संवाद साधणार आहे.

लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला मिळालेलं अपयश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी आखली जाणारी रणनीती यावर या बैठकीत विचार मंथन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झालेला वर्धा दौरा आणि आज अमित शहा यांचा नागपूर दौरा हा कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.

यावेळी सुरेश भट सभागृहाजवळ सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांचा फौजफाटा तैन्यात करण्यात आला आहे...

अमरावतीमध्ये हिट अॅण्ड रन

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील बाभळी टी पॉइंट येथे ट्रकने साठ वर्षीय इसमाला चिरडले.

अकोला कडून अंजनगाव सुर्जी कडे जात असताना सदर ट्रकच्या मागील चाकामध्ये येऊन इसमाचा जागीच मृत्यू.

घटनास्थळी नागरिकांची पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

वाहतूक विस्कळीत झाल्याने घटनास्थळी दर्यापूर पोलीस दाखल ट्रक चालक अपघात झाल्यानंतर ट्रक सोडून फरार

Pune News : नरेंद्र मोदी दौऱ्याअगोदर मेट्रो स्टेशन नावावरून वाद

नरेंद्र मोदी दौऱ्याअगोदर मेट्रो स्टेशन नावावरून वाद

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनचे नाव मंडई मेट्रो न देता महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन द्यावे अशी मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला मेट्रोच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन होणार आहे.यामध्ये मंडई मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.

या विरोधात आज मंडई मेट्रो स्टेशन समोर माळी महासंघातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार

सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार

26 तारखेला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या भूमिगत मार्गिकेचे उदघाटन होणार असले तरी अजून खूप काम बाकी आहे , लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने अपूर्ण स्थानकाचे ही उदघाटन केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

कल्याण पूर्वेकडील नांदीवली परिसरात धक्कादायक प्रकार

कल्याण पूर्वेकडील नांदीवली परिसरात धक्कादायक प्रकार

जुन्या वादातून तरुणाची हत्या

अयुब शेख असे मयत तरुणाचे नाव

कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या इतर फरार आरोपींचा शोध सुरू

जुन्या वाद मिटवण्यासाठी आले असता पुन्हा झाला वाद

या वादातून अयुब ची धारदार शस्त्रांनी केली हत्या

मुख्यमंत्र्यांनी सोलापुराचा दौरा पुढे ढकलला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या नियोजित असलेला सोलापुराचा दौरा पुढे ढकलला

लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापुरात नियोजित होता कार्यक्रम

मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस महाराष्ट्रमध्ये असल्याने या दोन दिवसात जागा वाटप संदर्भात महत्वाच्या बैठका होण्याच्या शक्यता असल्याने दौरा पुढे ढकलल्याची सूत्रांची माहिती

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांच्या मतांवर भाजपचा डोळा

विधानसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांच्या मतांवर भाजपचा डोळा. भाजप कोअर कमिटी बैठकीत युवा मोर्चा आणि महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी. तरुण आणि महिलांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याची व्यूहरचना. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी दिला जाणार भर.

शिवाजी विद्यापीठ वस्तीगृहातील मेस मधील जेवणात आळ्या; विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष

Summary

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मुलांचे वस्तीगृह क्रमांक एक मधील मेसच्या जेवणात अळ्या आढळल्याचां धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल जेवणावेळी वरनात अळ्या आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणाचा पंचनामा केलाय. तसेच जेवणात अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटल आहे. या संदर्भात रेक्टर सह विद्यापीठ प्रशासनाला निवेदनपत्र देऊनही दखल घेतली जात नसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलय. या प्रकारामुळे वस्तीगृहातील 200 हुन अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी करणार शरद पवार गटात प्रवेश

सदा सरवणकर काय म्हणाले ?

सिद्धिविनायक लाडू आणि महाप्रसादा संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो फेक असल्याचा दावा सिद्धिविनायक व्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला आहे.. सिद्धिविनायक परिसरात या ठिकाणी लाडू बनवले जातात किंवा ठेवले जातात तो परिसर अत्यंत स्वच्छ आहे मात्र जो व्हिडिओ काढला आहे तो उकिरडा असलेल्या ठिकाणी काढला आहे... त्यामुळे हा बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न कोणीतरी केला आहे असा देखील आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे... या प्रकरणात आम्ही चौकशी करून कारवाई करू... असं देखील ते म्हणाले

धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्याविरोधात राज्यभरात आदिवासी रस्त्यावर उतरणार

"समृद्धी" वरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सिला "ब्रेक" 

समृद्धी महामार्गावर टोलची रक्कम मोठी असूनही टोल नाक्यांवर सुविधा मिळत नसल्याच्या शेकडो तक्रारी वाहनधारकांनी केल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 69 नोटिसेस बजावल्यावरही टोल वसुली करणाऱ्या कंपनीने आपल्या कामात कुठलेही सुधारणा न केल्याने समृद्धीवरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सीचा कंत्राट आता एमएसआरडीसीने रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Bhandara : मोबाईल विकत घेऊन गावाकडे जाणाऱ्या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू

Bhandara News : मित्रासाठी मोबाईल घेऊन गावाकडे एका दुचाकीवरून परतनाऱ्या दुचाकीस्वारांना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अमित शहा हे निवडणूक शास्त्रात अतिशय बारकाईने मार्गदर्शन करणाऱ्यापैकी भाजपमधील नेते आहे. सूक्ष्म नियोजन करणार आहे. MVA ला समर्पक पद्धतीने उत्तर देऊन बुथवर लक्ष केंद्रित करण्यावर भर आहे.
सुधीर मुनगंटीवार

Mla Disqualification case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही म्हणून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून दाखल केल्यानंतर याचिका

मागच्या २ आठवड्यात कोर्टाने या सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या होत्या मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती

कोर्टाने आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित केली असल्याने आज तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आणि त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होणार असल्याने या प्रकरणाचा निकाल त्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे

आज कोर्टाने प्रकरण ऐकलं तर सुनावणीची दिशा निश्चित होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com