केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होणार आहेत. परीक्षाची वेळ सकाळी १०:३० वाजता असेल. सीबीएसईने परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक पाहून तयारील लागावे.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावीसाठी २६.५० लाख विद्यार्थी आणि इयत्ता बारावीसाठी १९.८० लाख विद्यार्थी परीक्षा देतील. वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याच्या १०१ दिवस आधी प्रसिद्ध करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर रोजीच्या सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार, इयत्ता दहावीचे विद्यार्थी ८३ विषयांच्या आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थी १२१ विषयांच्या परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थ्यांनी साधारणपणे निवडलेल्या विषयांच्या पेपरमधील अंतर, प्रमुख प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या यांसारख्या अनेक घटकांचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसईकडून तयार करण्यात आले आहे. सीबीएसईने असेही सांगितले की, मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना जास्त काळ शाळेपासून दूर राहावे लागू नये याची खात्री करण्यासाठी हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी निवडलेल्या कोणत्याही दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी येऊ नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने वेळापत्रक तयार करताना ४०,००० हून अधिक विषय संयोजनांचा विचार केला आहे. अधिसूचनेत सीबीएसईने असे म्हटले आहे की, शाळांनी उमेदवारांची यादी सादर केल्यानंतरच वेळापत्रक अंतिम करण्यात आले. सीबीएसईने असेही सांगितले की, परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांच्या संख्येचा विचार करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.