दहावीची बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात भीतीचं वातावरण असतं... विशेषतः गणित किंवा विज्ञानासारख्या विषयात नापास होण्याची अनेेक विद्यार्थ्यांना धास्ती असते. आता या टेन्शनवर CBSE बोर्डानं उपाय काढलाय...सीबीएसईने 2028 च्या दहावीच्या परीक्षांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना जाहीर केलीय. या नव्या नियमांनुसार, आता गणितात किंवा विज्ञानात नापास झालेला विद्यार्थीही थेट 'कौशल्या'च्या जोरावर पास होऊ शकणार आहेत..हा नवा नियम काय आहे? पाहूयात...
सीबीएसईच्या या नव्या योजनेनुसार विद्यार्थ्यांसाठी एकूण नऊ अभ्यासविषय अनिवार्य असणार आहेत
दोन भाषा, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र अशा 5 मुख्य विषयांची बोर्डाकडून परिक्षा घेतली जाईल..
गणित, विज्ञान किंवा भाषेच्या मुख्य विषयात एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, त्याला थेट नापास न ठरवता कौशल्याधारित विषयाच्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण होण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यासाठी व्यवसायिक शिक्षण हा विषय अनिवार्य करण्यात आलाय
त्यामुळे विद्यार्थ्यांना 'कौशल विकास' किंवा मंडळाने अधिसूचित केलेल्या 22 कौशल्याधारित विषयांपैकी एकाची निवड करावी लागेल.
AI, IT, माहिती विश्लेषण, वित्तीय बाजारपेठ, डिझाइन थिंकिंग यांसारख्या आधुनिक युगाला साजेसा अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे...
दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित विषयाची निवड केली आहे, त्यांना संबंधित विषयासह दहावीची बोर्ड परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे गुण गुणपत्रिकेत नमूद केले जातील...देशभरातील CBSE बोर्डाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये हा नवीन नियम 2028 पासून लागू होईल...
विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्यातील उपजत कौशलांना वाव देण्यासाठी CBSEनं घेतलेला हा निर्णय अत्यंत दूरगामी मानला जात आहे. या निर्णयामुळे केवळ पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांनाही उज्ज्वल भविष्याची कवाडे उघडी होतील....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.