केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत लागू करण्यात येणाऱ्या तीन-भाषा धोरणाबाबत नवीन मार्गदर्शक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह 7वी, 8वी आणि 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे, सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन नियम लागू होणार नाहीये. सध्या 7वी, 8वी आणि 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आणखी कोणते महत्त्वाचे बदल करण्यात आलेत ते जाणून घेऊया.
यंदा दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी CBSE ने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. बोर्डाने स्पष्ट केलंय की, तीन-भाषा धोरणातील नवीन नियम सध्याच्या दहावीच्या बॅचवर लागू होणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या बोर्ड परीक्षेची तयारी आतापर्यंत ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने करायची आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात किंवा परीक्षेच्या नियमांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही.
सध्या 7वी, 8वी आणि 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही CBSE ने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या विद्यार्थ्यांनी पुढे दहावीत प्रवेश घेतल्यानंतर तिसऱ्या भाषेची बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याचं म्हटलं जातंय. अनेकदा नवीन भाषा शिकण्याच्या दबावामुळे विद्यार्थ्यांचं मुख्य विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता बोर्डाच्या परीक्षेची चिंता नसल्यामुळे विद्यार्थी अधिक शांतपणे आणि आत्मविश्वासाने अभ्यास करू शकणार आहेत.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दोन भाषा निवडण्याचा पर्याय असतो. अशा विद्यार्थ्यांचाही बोर्डाने विचार केला आहे. सध्या 7वी, 8वी आणि 9वीत शिकणारे आणि दोन परदेशी भाषा शिकणारे विद्यार्थी त्यांचा अभ्यास सुरु ठेवू शकणार आहेत. मात्र यावेळी त्यांना दोन परदेशी भाषांसोबत एक भारतीय भाषेचा अभ्यास करावा लागणार आहे.
कोणतंही शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी योग्य ती पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य उपलब्ध असणं आवश्यक असतं. अशातच बोर्डाने हे स्पष्ट केलंय की, विद्यार्थ्यांची इयत्ता आणि ग्रेड पाहून गरजेचं असणारं शिक्षणांचं साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थांना शिकवण्यासाठी सोयीस्कर ठरू शकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.