सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहेत.
परीक्षा वेळापत्रकाची घोषणा केली.
विद्यार्थ्यांना नियोजनासाठी वेळ मिळणार आहे.
दहावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय. वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांच्या परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०२६ पासून सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. हा बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी-२०२०) च्या शिफारशींनुसार केला गेलाय.
सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. बोर्डाच्या परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होतील. दहावीच्या परीक्षा १० मार्च २०२६ रोजी संपतील. तर बारावीच्या परीक्षा ९ एप्रिल २०२६ पर्यंत चालतील. दोन्ही वर्गांच्या परीक्षा सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत होतील. सीबीएसईने वर्ग ९वी आणि ११ वीच्या नोंदणी डेटाच्या आधारे २४ सप्टेंबर २०२५ ला पहिल्यावेळी २०२६ ची परीक्षेसाठी एक प्रारंभिक अस्थायी डेटशीट जारी केली होती. शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे आगाऊ नियोजन करण्यास करणे सोपे जाईल, असा याचा उद्देश होता.
सीबीएसईने २०२५ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची अंतिम तारीखपत्रक जाहीर करण्यात आली आहेत.
डाउनलोड करण्यासाठी, खालील सोप्या स्टेप्स जाणून घ्या
अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
त्यानंतर होमपेजवर Latest @ CBSE' च्या सेक्शनवर जा.
येथे तुम्हाला CBSE Board Exam Datesheet 2025ची लिंक असेल , त्यावर क्लिक करा.
दहावी किंवा बारावीच्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर वेळापत्रक दिसेल.
त्यानंतर डाऊनलोड बटणावर क्लिक करून वेळापत्रक तुमच्याकडे सेव्ह करून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.